Breaking News
  • नगरसेवकाच्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती निदा खान; राजकीय कनेक्शन उघड
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. सतीश विडोळकर

हिंगोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा: डॉ. सतीश विडोळकर यांना 'भारत विभूषण सन्मान 2026' जाहीर

Dr. Satish Vidolkar: हिंगोलीचे डॉ. सतीश विडोळकर यांना भारत विभूषण सन्मान 2026 प्राप्त होणार आहे. त्यांच्या कृषी आणि सामाजिक उपक्रमांसाठी हा सन्मान दिला जात आहे. पुरस्कार सोहळा चंदीगड येथे होणार.


हिंगोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा डॉ सतीश विडोळकर यांना भारत विभूषण सन्मान 2026 जाहीर

Dr. Satish Vidolkar |

हिंगोली (Dr. Satish Vidolkar) : हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बातमी. संत नामदेव संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश नरहरराव विडोळकर (Dr. Satish Vidolkar) यांची प्रतिष्ठेच्या 'भारत विभूषण सन्मान 2026' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ISRHE संस्थेतर्फे दिला जाणारा हा सन्मान 'Visionary Leader in Agriculture & Social Empowerment' या श्रेणीत त्यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व आणि सामाजिक सबलीकरणा साठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराभिमुख करणाऱ्या त्यांच्या उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा येत्या 28 एप्रिल 2026 रोजी चंदीगड येथील पंजाब विधानसभेच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाला पंजाब विधानसभेचे  अध्यक्ष सरदार कुलतार सिंह संधवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यात विडोळकर (Dr. Satish Vidolkar) यांना सन्मानित करण्यात येईल. डॉ. सतीश विडोळकर यांनी गेल्या दोन दशकांपासून शेती आणि समाजकारणाची यशस्वी सांगड घातली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेव संस्थेने हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण आहे. ISRHE चे अध्यक्ष डॉ. अतुल कुमार शर्मा व सचिव डॉ. रेशू गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पुरस्कारामुळे हिंगोलीचे नाव राष्ट्रीय पटलावर पुन्हा एकदा उजळ झाले असून, जिल्ह्यातील तरुणांसाठी विडोळकर यांचे कार्य प्रेरणादायी ठरणार आहे.

Related to this topic: