Dr. Babasaheb Ambedkar: मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 सबंधाने तयारीची बैठक झाली. पोलिसांनी आयोजन, नियमांचे पालन व सुरक्षिततेच्या सूचना दिल्या.
Dr. Babasaheb Ambedkar |
मानोरा (Dr. Babasaheb Ambedkar) : पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत मानोरा शहर तसेच ग्रामीण भागात पार पडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar जयंती उत्सव 2026 सबंधाने पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या मिटींगचे आयोजन पोलीस स्टेशन आवारात करण्यात आले होते.
सदर मीटिंग दरम्यान पोलीस पाटील यांच्यासह उपस्थित पदाधिकारी होते. पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांनी मिरवणुका काढताना प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करावे, सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा चुकीची माहिती प्रसारित करू नये, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावी, वाहतूक व्यवस्थापन व गर्दी नियंत्रण यासाठी सहकार्य करावे, अशी मार्गदर्शक सूचना केली.
तसेच मिरवणूक मध्ये कोणी डीजे लावणार नाही याची दक्षता घ्यावी,मिरवणूक दरम्यान मद्यपान करू नये. तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे गाणे वाजवू नये, मिरवणूक दिलेल्या वेळात काढावी व दिलेल्या वेळेस संपवावी कोणी उशिर करू नये. पोलीस पाटील यांनी नमूद काळात गावात दररोज सकाळी गुड मॉर्निंग करावी व पोस्टे व्हाट्सअप ग्रुप वर सदरचे फोटो टाकावे, सदर मीटिंग करिता गोपनीय पोलीस कर्मचारी दत्तात्रय भावके, पोलीस पाटील गोपाल लाहोटी, निलेश ठाकरे, वासुदेव सोनोने, गोविंद हेडा , विजय आडे, संजीवनी राठोड,ज्योतीताई शिंदे, सुरेखा राठोड सह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.