Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूकीत कर्णकर्कश डिजे वाजविल्याने गुन्हे दाखल

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूकीत ध्वनि प्रदूषण व पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे हिंगोली व वसमत तालुक्यात १७ गुन्हे दाखल.


डॉ आंबेडकर जयंती मिरवणूकीत कर्णकर्कश डिजे वाजविल्याने गुन्हे दाखल

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti |

हिंगोली शहरामध्ये सर्वाधिक १४ गुन्हे दाखल

हिंगोली/ वसमत (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिलला सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत कर्णकर्कश डिजे वाजविल्याने तसेच पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने हिंगोली व वसमत तालुक्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.  हिंगोली शहरात तब्बल १४ गुन्हे दाखल करण्यात आले असुन रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

हिंगोली तालुक्यात गुन्हे दाखल
हिंगोली:
आडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) मिरवणूक दरम्यान १४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास कर्णकर्कश आवाजामध्ये डिजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करून  जिल्हाधिकार्‍यांच्या महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१), (३) च्या आदेशाचे उल्लंघन केल्याने बासंबा पोलिस ठाण्यात माधव भडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयंती समितीचे अध्यक्ष यशवंत सिताराम हनवते, उपाध्यक्ष विश्वनाथ माधव हनवते, सचिव मुनीर कौसर पठाण रा. आडगाव, डिजे ऑपरेटर परेवश किसन राठोड, डिजे वाहन चालक प्रविण वसंत राठोड,डिजेचा मालक रंगराव खुबा राठोड रा. जाभंळी तांडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

वसमत तालुक्यात तीन गुन्हे दाखल
वसमत:
 वसमत तालुक्यातील चोंडी रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजे लावून ध्वनि प्रदूषण केले व नियमाच्या भंग केला या कारणास्तव जयंती मंडळाचे आयोजक व डीजे चालक-मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कुरुंदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संभाजी मारोतराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश गौतम जाधव ,मयुर ग्यानोजी ढेंबरे, संजय पांडुरंग कांबळे, रामराव भिमराव सरोदे सर्व रा. चोडीआंबा  आदीनाथ साहेबराव ढोरे रा. वाखारी, सुशिल वामन गायकवाड , अजय राम मोरे, अनिकेत राजेश्वर सरोदे, शैलेश राहुल सरोदे, रुपेश सटवा कांबळे सर्व रा. चोडी स्टेशन, महेश धनाजी नादरे रा. गिरगाव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  गंधकवाड  करत आहेत.

वसमत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) मंडळाच्या आयोजकांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १५ जयंती मंडळांच्या आयोजका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसमत पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद शेषेराव दळवी  यांनी तक्रार दिली की वसमत येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाना नोटीस बजावुन सुध्दा त्यानी पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही आदेशाचे उल्लंघन केले.

या आशयाची तक्रार दिली त्यावरून वसमत पोलीस ठाण्यात डॉ. आंबेडकर नगर (चौक) मित्र मंडळ वसाहत आयोजक अभिजित जोगेंद्र आरवीकर ,पंचशिल नगर जयंती मंडळ आयोजक रोहन सुभाष राउत, अशोकनगर भिमजयंती मडळ आयोजक सागर राजेश आटकोरे ,सिध्दार्थ नगर मंडळ आयोजक अनिल सखाराम आझादे , काशिनारा बौद्ध विहार जयंती मंडळ आयोजक मोहन प्रकाश एरंडे,आंबेडकर नगर जयंती मंडळ आयोजक सिध्दार्थ घनशाम दातार , भिमनगर मित्र मंडळ आयोजक अभय बालाजी कांबळे , भिमयोध्दा मित्र मंडळ आयोजक रुपेश वाहुळे, गौतम नगर जयंती उत्सव समिती आयोजक नागेश शंकरराव कांबळे, फुले नगर मित्र मंडळ आयोजक संदेश देविदास सुर्यवंशी, हर्ष नगर जयंती मंडळ आयोजक राहुल उतमराव धायजे , सम्राट कॉलनी मित्र मंडळ आयोजक सुमित तुळशिराम खंदारे , नागशेन नगर मित्र मंडळ आयोजक सागर रवि कोल्हे ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आयोजक अनंता गुंडाजी उबारे , पुर्णा प्रकल्प वसाहत जयंती मंडळ आयोजक सचिन मधुकर ईगोले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक .प्रणिता ढोरे करत आहेत.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केले व पोलिसाच्या आदेशाचे उल्लंघन केले याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यामध्ये डीजे चालक-मालक व जयंती मंडळाचे आयोजकांचा समावेश आहे. रूमला पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नामदेव रामचंद्र कोटकर यांनी तक्रार दिली की कुरुंदा येथे मिरवणुकीमध्ये डीजे चालक-मालक व आयोजकांनी ध्वनी प्रदूषण करून कायद्याचे उल्लंघन केले व पोलिसांच्या सूचनांचे पालन केले नाही त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नामदेव कोटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून  राजेश नागोराव सोनटक्के, लखन गिरजाजी काळे,  राजेश नागोराव काळे, जय पि. विजय लोखंडे, गोपाळ गंगाधरजी खंदारे ,शिवराज सुभाष वाघमारे  प्रकाश मारोती धुमाळ रा. मंगळवारा हिंगोली,  युवराज बाबनराव सोनटक्के,  संतोष ईश्वर काळे, नितीन आओबा ढाले, सुनील जळबाजी कदम, महादु गौतम शिरसाठ रा श्रावस्ती नगर कुरूंदा , श्रीकांत शिवाजी काबळे रा. सिडकोनादेड, मानीक गोविंदराव वारे रा. मुरुंबा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार वडकिले करत आहेत.

Related to this topic: