Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एनसीडीईएक्स मानकांबाबत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

Collector Rahul Gupta:


हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एनसीडीईएक्स मानकांबाबत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

Collector Rahul Gupta |

 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे शेतकऱ्यांना आवाहन

हिंगोली (Collector Rahul Gupta) : हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात सुमारे 10 लाख क्विंटल हळद उत्पादन होत असून, हळद हे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे पीक आहे. हळदीच्या उत्पादनाला अधिक चांगला बाजारभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राष्ट्रीय कमोडिटी व डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्चेंज लिमिटेड (एनसीडीईएक्स) मानकांनुसार दर्जेदार उत्पादन घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

'एनसीडीईएक्स'च्या गोदामांमध्ये हळद साठवणुकीसाठी माफक दर आकारले जातात. मात्र, हळद 'एनसीडीईएक्स'च्या निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार असणे आवश्यक आहे. अनेकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार होणाऱ्या हळदीची गुणवत्ता आवश्यक मानकांशी जुळत नसल्याने माल नाकारला जातो. परिणामी शेतकऱ्यांना गोदामांमध्ये साठवणूक करण्यास अडचणी निर्माण होतात. 

हळद शिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान योग्य तापमान राखले जात नसल्याने गुणवत्तेवर परिणाम होतो आणि माल नाकारण्याचे प्रमाण वाढते. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये हळद उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता निकष, साठवणूक, एनसीडीईएक्स मानके तसेच बाजारपेठेतील आवश्यक गुणवत्ता निकषांविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी हळदीच्या उत्पादनापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक मानकांचे पालन केल्यास दर्जेदार उत्पादन मिळून बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळू शकतो. तसेच एनसीडीईएक्स मानकांनुसार माल स्वीकारला जाऊन साठवणूक व विक्री प्रक्रियेतही लाभ मिळू शकतो. हिंगोली जिल्ह्यातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन दर्जेदार हळद उत्पादनासाठी आवश्यक बाबींची माहिती घ्यावी, असे आवाहन (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Related to this topic: