Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > मुंबई

Disha Salian Case

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवे वळण; हायकोर्टाचा तपास CBIकडे सोपवण्याचा आदेश

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा वेगळे वळण घेतले आहे.


दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवे वळण हायकोर्टाचा तपास cbiकडे सोपवण्याचा आदेश

Disha Salian Case |

BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याचेही आदेश

मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा वेगळे वळण घेतले आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच तपास केल्याची बाब समोर आल्यानंतर आता BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. दिशाच्या मृत्यूची परिस्थिती आणि त्यामागील कारणांबाबत सतीश सालियन यांनी याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

CBIकडून सखोल तपासाचे निर्देश

हायकोर्टाने CBIला या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यास सांगितले आहे. तपास सुरू करण्यापूर्वी सतीश सालियन यांचा अधिकृत जबाब नोंदवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तपास यंत्रणेने अंतिम अहवाल किंवा निष्कर्ष सादवल्यानंतर त्यावर समाधान न झाल्यास याचिकाकर्त्यांना न्यायालयात त्याला आव्हान देण्याचा अधिकारही खंडपीठाने कायम ठेवला आहे.

न्यायालयाच्या या आदेशानंतर सतीश सालियन यांनी समाधान व्यक्त केले. मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

८ जून २०२० रोजी झाला होता मृत्यू

दिशा सालियन यांच्या मृत्यूची घटना ८ जून २०२० रोजी घडली होती. मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून संशयास्पद परिस्थितीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानून अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासात आत्महत्येचा निष्कर्ष समोर आल्याने प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

वडिलांनी पोलिसांच्या तपासावर उपस्थित केले प्रश्न

मात्र, सतीश सालियन यांनी पोलिसांच्या या निष्कर्षाला विरोध केला. आपल्या मुलीच्या मृत्यूमागे गंभीर गुन्हेगारी कारण असण्याचा आरोप करत त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मृत्यूची परिस्थिती आणि पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी न्यायालयासमोर प्रश्न उपस्थित केले.

आता हायकोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास CBIकडून केला जाणार असून, BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही पुढे जाणार आहे. त्यामुळे २०२० पासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

Related to this topic: