Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर जिल्हा परिषद

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत बैठक

Latur Zilla Parishad: विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार दि. २५ व २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत बैठक 

Latur Zilla Parishad |

विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा; प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

लातूर (Latur Zilla Parishad) : विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार दि. २५ व २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे आणि सचिव किशोर गायकवाड यांनी आक्रमकपणे प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन (Latur Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

​​सामान्य प्रशासन विभागाने ऑनलाइन फाईल्स पेंडिंग राहण्याचा विषय निकाली काढणे, प्रशासकीय कामाचा वाढीव पदभार आणि कालबद्ध वेतनश्रेणी बहाल करणे. वित्त विभागाने जीपीएफचा लॉट किमान १५ दिवसांतून एकदा पाठवणे आणि सर्व्हिस बुक (सेवा पुस्तक) पडताळणी पूर्ण करणे यावर चर्चा करण्यात आली. ​(Latur Zilla Parishad) समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांचे समायोजन व पगार काढणे, कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवणे आणि सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, ​पंचायत विभागाने हिंदी विषय माध्यमिक स्तरावर नसल्याने १०, २०, ३० वर्षांचा लाभ रोखून न धरण्याबाबत चर्चा झाली.

​शिक्षण विभाग: विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा लाभ देणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे आणि रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, मार्गदर्शक दिलीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम गायकवाड, यशवंत माने, चंद्रकांत मोठेराव, रवी कुरील, अनिलकुमार नाईकवाडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखारडे, लेखा विभागाचे प्रमुख श्री नागणे, समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. वाघ, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे इत्यादींनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

जि.प. पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जि. प. अध्यक्षा उषाताई पाटील,  जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दयानंद सुरवसे, गट नेते रामभाऊ तिरुके यांचा सत्कार करण्यात आला.

Related to this topic: