Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ई पिक पाहणीत हलगर्जीपणा भोवणार, टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई!

महसूल विभागाचे कणा असलेल्या गाव नमुना ७ - १२ मध्ये पिकांच्या अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी, आता शासनाने कंबर कसली आहे.


ई पिक पाहणीत हलगर्जीपणा भोवणार टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

Digital Crop Survey |

शासनाचे धडकले कडक आदेश

मानोरा (Digital Crop Survey) : महसूल विभागाचे कणा असलेल्या गाव नमुना ७ - १२ मध्ये पिकांच्या अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी, आता शासनाने कंबर कसली आहे. ॲग्रीस्टॅक या नवीन संकल्पनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२४ - २५ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍपद्वारे पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार पूर्वी पिकांच्या नोंदी तलाठी स्तरावर केल्या जात होत्या, मात्र १५ ऑगस्ट २०२१ पासून ही जबाबदारी ई पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे थेट शेतकऱ्याकडे सोपविण्यात आली होती. आता यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि अचूक संच तयार करण्यासाठी अग्रिस्टक संचालनयाची स्थापना करण्यात आली असून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा स्तरापासून गाव पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या विभागले आहेत. संपूर्ण जिल्हयाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हंगामापूर्वी जिल्हा कृषी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करणे, खरीप आणि रब्बी अशी वर्गवारी करून ती जमाबंदी आहेत त्यांना कळविणे आदी जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्यावर तालुकास्तरीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक गावासाठी एका पीक पाहणी सहायकाची नेमणूक करणे, नेमलेल्या सहायकांना ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत तातडीने मान्यता मिळवून देणे ही जबाबदारी तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ग्राम महसूल अधिकारी यांना सहायकांनी नोंदविलेला पीक पाहणीच्या नोंदीची १०० टक्के पडताळणी करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष जमिनीवर असलेले पीक आणि ॲप मधील नोंद याची खातरजमा करण्याचे मुख्य जबाबदारी तलाठ्यांची असेल असे शासन आदेशात स्पष्ट नमूद केले आहे. 

या प्रक्रियेत डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत १०० टक्के पिक नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या क्षेत्रात पीक पाहणीच्या नोंदीमध्ये तफावत आढळली किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत पडताळणी पूर्ण केली नाही तर त्यांच्या प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिली आहे.  शासनाचा हा निर्णय शेती क्षेत्रातील अचूक आकडेवारी  मिळविण्यासाठी आणि पीक विमा नुकसान भरपाई यासारख्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी अचूक ठरणार आहे.

Related to this topic: