Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

गो सन्मान रॅली

देऊळगाव राजा येथे निघाली भव्य गो सन्मान रॅली

Go Samman Rally: देऊळगाव राजा येथे गोप्रेमी व विविध समाज संघटनांच्या सहभागाने गो सन्मान रॅली निघाली. यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला, शासकीय निवेदने देण्यात आली.


देऊळगाव राजा येथे निघाली भव्य गो सन्मान रॅली

Go Samman Rally |

देऊळगाव राजा (Go Samman Rally) : गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत दिनांक 27 एप्रिल रोजी शहरातील समस्त गोप्रेमी यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथून भव्य रॅली काढण्यात आली व शासकीय विश्रामगृह येथे तहसीलदार यांच्या मार्फत महाबहीम राष्ट्रपती, पंतप्रधान , मुख्यमंत्री ,राज्यपाल आदींना हजारो गोभक्त नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले .या रॅलीमध्ये हजारो गोप्रेमी सहभागी झाले होते .हे अभियान चार टप्प्यांमध्ये होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये निवेदन देण्यात आले आहे.

देऊळगाव राजा शहरातून भव्य गोसन्मान (Go Samman Rally) आवाहन अभियान निवेदन रॅलीचे आयोजन आज दि 27 एप्रिल रोजी करण्यात आले , गो सन्मान आव्हान रॅलीचे देशभर आयोजनाची मांडणी वृंदावन येथे विविध  संत,महाराज,गोप्रेमी, धर्मप्रेमी मंडळींनी  केलेली आहे. त्यानिमित्ताने तालुका तहसिल कार्यालय देऊळगाव राजा येथील तहसीलदार यांना  हजारोंच्या सह्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

या (Go Samman Rally) निवेदनात संपूर्ण भारतात हा दिवस गोसन्मान दिन म्हणून  साजरा व्हावा.भारतीय संसदेत कायदा पास होऊन संपूर्ण देशात गोहत्या-गोतस्करी बंदी कायदा समान पातळीवर लागू करावा. तसेच  कायदा उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करावी.गोसेवकांना , गोशाळांना संरक्षण मिळावे तसेच  शासकीय पातळीवर गोउत्पादनांना बाजार संरक्षण मिळावे.देशी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा प्राप्त व्हावा.

भारतीय शिक्षण पद्धतीमद्धे गोवंश संबंधी पालनपोषण,कृषी आधारित उपक्रम  व संरक्षण याबाबतचा समावेश करावाभारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान होण्यासाठी या सर्व बाबींची संपूर्ण देशभर  एकवाक्यता  रहावी कोणत्याही राज्याने यात हयगय किंवा टाळाटाळ करू नये. यासाठी हे अभियान प्रथम टप्प्यात राबविले गेले.यावेळी तहसिल मार्फत मा .मुख्यमंत्री, मा . राज्यपालं 'मा. पंतप्रधान व मा. राष्ट्रपती यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

पुढील वर्षभर चार टप्प्यात हे अभियान सुरू राहील. यावेळी संपूर्ण गावातील व्यापारी प्रतिष्ठाने ,दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने  बंद ठेवली होती. गावातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक ,नोकरदार, महिला, युवा, विद्यार्थी, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी,राजकीय क्षेत्रातील मान्यवर , गोशाळेचे व मंदिर समितीचे  प्रतिनिधी, वारकरी,दिंडीकरी, भजनी मंडळ , संत-महाराज, पत्रकार बांधव,राजकीय क्षेत्रातील विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते ,सन्माननीय आजी व माजी आमदार ,नगराध्यक्ष, नगरसेवक,विविध संस्थांचे प्रतिनिधी  तसेच बजरंग दल कीन्नर  समितीचे अध्यक्ष हे सर्व हिरीरीने सहभागी झाले.स्थानिक पोलीस स्टेशन ,तहसिल प्रशासन ,नगरपालिका या सर्वांचे सहकार्य लाभले. अनेक बांधवांनी जागोजागी पुष्पवृष्टी, गोमाता व नंदी पूजन तसेच पाणी व फळेवाटप केले. गोप प्रेमींनी मनोगत व्यक्त केले ,काही मान्यवरांनी शेवटी पुढील अभियानाची रणनिती व आवश्यकता माध्यमांतसमोर विषद केली.तसेच सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले..सदर रॅलीचे आयोजन देऊळगाव राजा तालुक्यातील व शहरातील गोसेवक व गोरक्षक यांनी केले.

Related to this topic: