Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

नागपूर जिंगाबाई टाकळी थरारली;नारा घाटाजवळील नाल्यात मृतदेह सापडला

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेपत्ता तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


नागपूर जिंगाबाई टाकळी थरारलीनारा घाटाजवळील नाल्यात मृतदेह सापडला

Dead Body In Drain |

नागपूर : बेपत्ता तरुणाचा खून उघड; मृतदेह नाल्यात गोणीत आढळला

नागपूर (Dead Body In Drain) : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेपत्ता तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर परिसरातून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या राहुल सुनील साहू (वय ३८) याचा मृतदेह जिंगाबाई टाकळी परिसरातील नारा घाटाजवळील नाल्यात गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडला.

राहुल साहू हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो काही काळापासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, मंगळवारी त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

प्राथमिक तपासात, अज्ञात आरोपींनी राहुलची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे जिंगाबाई टाकळी व जरीपटका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आता हत्येमागील नेमके कारण शोधण्यासोबतच आरोपींचा शोध घेत आहेत. तपास वेगाने सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: