Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

आश्रमशाळा विद्यार्थिनी मृत्यूप्रकरण

कोटगूल आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून १० लाखांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी

Ashram school Student Death: शासकीय आश्रमशाळा, कोटगूल येथील विद्यार्थिनी हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आश्रमशाळा प्रशासनावर कठोर कारवाई


कोटगूल आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून १० लाखांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी

Ashram school Student Death |

कोरची (Ashram school Student Death) : शासकीय आश्रमशाळा, कोटगूल येथील इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी कु. संजना बिरसिंग जाळे हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आश्रमशाळा प्रशासनावर कठोर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कोरची) तालुकाध्यक्ष अनिल तुलाराम केरामी यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, १९ जुलै २०२६ रोजी विद्यार्थिनीला आजारी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटगूल येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी मलेरिया पॉझिटिव्ह आढळूनही हिमोग्लोबिन (HB) तपासणी न करता केवळ औषधे देऊन परत आश्रमशाळेत पाठविण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर २३ जुलै रोजी प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुन्हा दवाखान्यात नेल्यावर तिचे हिमोग्लोबिन अवघे ३.५ ग्रॅम असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात रेफर करणे आवश्यक असतानाही तसे न करता दवाखान्यातच ठेवण्यात आले. यामुळे योग्य वेळी उपचार न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याशिवाय, (Ashram school Student Death) प्राथमिक आरोग्य केंद्रातील OPD नोंदवहीत तारखांमध्ये फेरफार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर, कर्मचारी व आश्रमशाळेच्या अधीक्षकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणामुळे मृत्यू, खोटे दस्तऐवज तयार करणे व पुरावे नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच १८ ते २३ जुलै २०२६ या कालावधीतील OPD रजिस्टर तात्काळ जप्त करून चौकशी करण्यात यावी आणि मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने 10 दिवसांत ठोस कारवाई न केल्यास  शाळा बंद आंदोलन करण्यात येईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कोरची)च्या , असा इशाराही अनिल केरामी यांनी दिला आहे.