Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर चाकूरकर स्मारक

स्मारकाबाबत चाकूरकर परिवारांच्या सूचनांचा सन्मान करणार; काँग्रेस पक्षाने जाहीर केली भूमिका

Latur Chakurkar Memorial: देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाबाबत काँग्रेस पक्ष चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा करणार सन्मान करेल, अशी भूमिका काँग्रेस पक्ष


स्मारकाबाबत चाकूरकर परिवारांच्या सूचनांचा सन्मान करणार काँग्रेस पक्षाने जाहीर केली भूमिका

Latur Chakurkar Memorial |

लातूर (Latur Chakurkar Memorial) : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाबाबत काँग्रेस पक्ष चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा करणार सन्मान करेल, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार, बुधवारी देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Latur Chakurkar Memorial) यांच्या पुतळ्याच्या संदर्भाने लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, सभागृह नेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर सर व माजी अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक ॲड. किरण जाधव यांनी बुधवारी 'देवघर' या निवासस्थानी शैलेश पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

चाकूरकर परिवारांच्या दिशानिर्देशांचे पालन लातूर शहर महानगरपालिका करेल, असे महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांनी यावेळी शैलेश पाटील चाकूरकरांना आश्वस्त केले.
त्यानंतर काँग्रेसने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले असून येत्या चार दिवसांमध्ये परिवारांच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यात म्हटले आहे.

Related to this topic: