Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

कॅनरा बँक शाखा

कॅनरा बँक शाखेतील कामकाजाबाबत महिला ग्राहकाची मुख्य कार्यालयाकडे तक्रार

Canara Bank Branch: शाखेतील संबंधित कर्मचारी आणि व्यवस्थापनाकडून महिला ग्राहकांशी योग्य समन्वय न राखता गैरवर्तन केले जात असल्याची लेखी तक्रार बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली आहे.


कॅनरा बँक शाखेतील कामकाजाबाबत महिला ग्राहकाची मुख्य कार्यालयाकडे तक्रार

Canara Bank Branch |

पातूर (Canara Bank Branch) : स्थानिक कॅनरा बँक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाखेतील संबंधित कर्मचारी आणि व्यवस्थापनाकडून महिला ग्राहकांशी योग्य समन्वय न राखता गैरवर्तन केले जात असल्याची लेखी तक्रार बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगिखेड येथील रहिवासी सौ. सुनीता रमेश उपर्वट यांनी बेंगळुरू येथील (Canara Bank Branch) कॅनरा बँक मुख्य कार्यालयाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. सुनीता उपर्वट या बँकेत माहिती घेण्यासाठी गेल्या असता, तेथील कर्मचारी अतुल शेजाव आणि शाखा व्यवस्थापक यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ एकाच ग्राहकाबाबत हा प्रकार घडला नसून, परिसरातील महिला बचत गटातील इतर महिलांनाही अशाच प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बँकेत येणाऱ्या महिला ग्राहकांशी संवाद साधताना कर्मचारी योग्य भाषेचा वापर करत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची पाठराखण न करता त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. ग्राहकांना सन्मानजनक वागणूक मिळणे अपेक्षित असताना बँकेतील या (Canara Bank Branch) प्रकारामुळे आता वरिष्ठ प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: