Parbhani Girl Abused: मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलवून एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पूर्णा तालुक्यातील एका गावात घडली. सदरचे गाव चुडावा पोलीस ठाणे हद्दित
बाल लैंगिक अत्याचार मुक्त कधी होणार
परभणीतो पूर्णा तालुक्यातील घटना; चुडावा पोलिसात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Girl Abused) : मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलवून एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पूर्णा तालुक्यातील एका गावात घडली. सदरचे गाव चुडावा पोलीस ठाणे हद्दित येत असल्याने आरोपीवर ५ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या (Parbhani Girl Abused) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पिडित मुलीच्या आईने या बाबत तक्रार दिली आहे. शुक्रवार ३ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपीने पाच वर्षीय मुलीला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. ही घटना चुडावा पोलीस ठाणे हद्दितील एका गावामध्ये घडली. पिडितेच्या नातेवाईकांनी धिर दिल्यानंतर पिडितेच्या आईने शिवराज लोखंडे याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
चष्म्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
परभणी : चष्मा देतो, असे अमिष दाखवून साडे चौदा वर्षीय मुलीवर चारचाकी वाहनात बसवत चष्म्याच्या दुकानात नेले. या ठिकाणी मुलीवर अत्याचार केला. मुलगी गरोदर झाल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी दिपक उर्फ अनिकेत याच्यावर २ जुलै रोजी सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.