Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

खेळता खेळता पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

शहरातील बोधे नगर परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, खेळत असताना पाण्याच्या डबक्यात पडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


खेळता खेळता पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

Child Safety Awareness |

लातूर (Child Safety Awareness) : शहरातील बोधे नगर परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, खेळत असताना पाण्याच्या डबक्यात पडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील भागात टँकरसाठी पाणी साठविण्यात येणाऱ्या डबक्यात खेळता खेळता दोन चिमुकले पडले. या घटनेत दिव्या नवनाथ उबाळे (वय ६) आणि कार्तिक भरत कांबळे (वय ७) यांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे बोधे नगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशा धोकादायक पाणीसाठ्यांभोवती सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: