Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गोंदिया

चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास जन्मठेप;जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

गोंदिया शहरातील गौतमनगर परिसरात एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना सन २०२४ मध्ये घडली होती


चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास जन्मठेपजिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

Child Abuse Case |

गोंदिया (Child Abuse Case) : गोंदिया शहरातील गौतमनगर परिसरात एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना सन २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणाचा निर्वाळा देत जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. हा ऐतिहासिक निर्वाळा जिल्हा व सत्र न्यायालय-३ चे न्या.गौतम यांनी ४ मे रोजी सुनावली. लक्ष्मण उर्फ मुका ईसरु ब्राम्हणकर (४७) रा.गौतमनगर, गोंदिया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर असे की, गौतमनगर येथील आरोपी लक्ष्मण उर्फ मुका ईसरु ब्राम्हणकर (४७) याने ८ मे २०२४ रोजी ७ वर्षीय एका अल्पवयीन मुलीला फुस लावून आपल्या घरी नेले होते. घराचा दरवाजा आतून बंद करून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कलम ३७६ (एबी), ३७६ (जे) भादंवि आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ च्या कलम ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप  सादर केला. न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्पेâ  सादर करण्यात आलेले साक्ष-पुरावे आणि युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. दरम्यान प्रकरणाचा निर्वाळा देताना विशेष न्यायाधीश (पॉक्सो) तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी आरोपी लक्ष्मण उर्फ मुका ईसरु ब्राम्हणकर याला जन्मठेप व २० हजार रूपये द्रव दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास दोन वर्षांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयात सरकार पक्षातर्पेâ सरकारी अभियोक्ता सतीश यु.घोडे यांनी बाजू मांडली. तर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा सुरळकर यांनी केला. न्यायालयीन कामकाजात मपोशी नीता पोटफोडे यांनी सहकार्य केले.

Related to this topic: