Chikhli Independence Day: चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे तब्बल ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजारोहण करण्यात येणार असून, हे ध्वजस्तंभ जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ
आ. श्वेता महालेंनी दिला शहीद हरिदास कापसेंच्या वीरपत्नीला ध्ववाजारोहणाचा मान
चिखली (Chikhli Independence Day) : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चिखली शहरात यंदा देशभक्तीचा अनोखा आणि अभिमानास्पद सोहळा रंगणार आहे. चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे तब्बल ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजारोहण करण्यात येणार असून, हे ध्वजस्तंभ जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ध्वजस्तंभांपैकी एक ठरणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा स्वातंत्र्यदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या (Chikhli Independence Day) सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भारताच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या वीरपत्नी श्रीमती वृषालीताई हरिदास कापसे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता राजा टॉवर येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानाच्या कुटुंबातील वीरपत्नीच्या हस्ते तिरंगा फडकवून त्यांच्या त्यागाला आणि शौर्याला अभिवादन करण्याचा हा भावनिक क्षण ठरणार आहे.
यानंतर सकाळी ९.१५ वाजता राजा टॉवर येथून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी चिखली शहर दुमदुमणार असून, नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारा हा उपक्रम ठरणार आहे.
सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उंच आकाशात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज, शहीद जवानाच्या वीरपत्नीची उपस्थिती आणि हजारो नागरिकांचा राष्ट्रप्रेमाचा उत्साह यामुळे हा सोहळा चिखलीच्या स्वातंत्र्यदिनाच्या इतिहासातील विशेष क्षण ठरणार आहे.
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखलीत राष्ट्रप्रेम, शौर्य आणि विकासाच्या भावनेला एकत्रित करणाऱ्या या उपक्रमातून ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना सलाम आणि तिरंग्याला मानाचा मुजरा’ असा संदेश दिला जाणार आहे. शहीद हरिदास कापसे यांच्या बलिदानाची आठवण जागवत त्यांच्या वीरपत्नीच्या हस्ते तिरंगा फडकविणे हे त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारेही ठरणार आहे.असे आ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या.
या (Chikhli Independence Day) कार्यक्रमाला नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, नगरपरिषद पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा चिखली शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले आहे.