Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

आमदार श्वेता महाले पाटील

चिखलीच्या तहानलेल्या भविष्यास दिलासा...चिखलीमध्ये ७.२५ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

MLA Shweta Mahale Patil: चिखळीच्या जिल्हाध्यक्ष आमदार श्वेता महाले पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शहरामध्ये नवीन पाण्यापुरवठा योजनेचे भुमिपूजन केले. योजना ७.२५ कोटी रुपयांची आहे


चिखलीच्या तहानलेल्या भविष्यास दिलासाचिखलीमध्ये ७२५ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

MLA Shweta Mahale Patil |

 

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक वर्षांच्या उणिवा दूर करून नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत पेनटाकळी येथे सुमारे ७ कोटी २५ लाख रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

चिखली शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेतील मर्यादा लक्षात घेऊन आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यातूनच या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी मिळाली असून शहराच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर, इनटेक वेल कनेक्टिंग मेन, जॅक वेल, अप्रोच ब्रिज तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. या कामांमुळे भविष्यात चिखली शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, नियमित आणि दर्जेदार पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विविध जलसंपदा आणि पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. शहराच्या विकासासाठी पाणी ही मूलभूत गरज असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली असून त्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यात यश मिळविले आहे. या विकासकामामुळे चिखली शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडणार आहे.

चिखलीकरांना भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक योजना मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे. नागरिकांना अखंड आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळणे हेच या विकासकामामागील प्रमुख उद्दिष्ट आहे," असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, रामदास देव्हडे, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, गटनेता अमोल खबूतरे, बांधकाम सभापती सुहास शेटे, नगरसेवक दीपक खरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर, राम बनसोडे, दीपक भाकडे, प्रा. निलेश गावंडे, डॉ. महमद इसरार, गोपाल देव्हडे, मोहित व्यवहारे, बाळू जाधव, आनंद बोंद्रे, गोकुळ शिंगणे, रत्नदीप शिनगारे, संतोष देशमुख, प्रशांत भटकर, सिद्धेश्वर ठेंग, यशवंत मुंढे, इंजिनिअर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते...

Related to this topic: