MLA Shweta Mahale Patil: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थित बूथ लेव्हल सहाय्यकांना विशेष मार्गदर्शन करताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार...
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात SIR मोहिमेला वेग"
चिखली (MLA Shweta Mahale Patil) : विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सुरू असलेल्या एस आय आर 2026 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, चिखली विधानसभा मतदारसंघातर्फे बूथ लेव्हल सहाय्यकांची महत्त्वपूर्ण कार्यशाळा बालाजी अर्बन, चिखली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थित बूथ लेव्हल सहाय्यकांना विशेष मार्गदर्शन करताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मोहिमेचे महत्त्व विशद केले.
आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) म्हणाल्या की, "लोकशाही अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यावश्यक आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी बूथ स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येक सहाय्यकाने जबाबदारीने आणि समर्पित भावनेने कार्य करावे."

त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) पुढे सांगितले की, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले बीएलओ अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणार असून, प्रत्येक कुटुंबातील सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी बीएलओ कर्मचाऱ्यांना योग्य सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे आणि दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी बूथ लेव्हल सहाय्यकांना प्रत्येक मतदान केंद्र परिसरात जनजागृती करण्याच्या सूचना देत, नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे तसेच मृत किंवा अपात्र मतदारांच्या नोंदींची योग्य पडताळणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी आ. श्वेता महाले यांनी बूथ लेव्हल सहाय्यकांनी निवडणूक आयोगाच्या या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले.एसआयआर मोहिमेची उद्दिष्टे, मतदार नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, बीएलओ यंत्रणेचे कार्य तसेच मतदार यादी शुद्धीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.