Chikhali Police Enforcement: चिखली शहरातील आठवडी बाजार परिसरातील सुनील उर्फ लाला हिरालाल चुनावाले (वय 50) याच्यावर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 56(1)(अ)(ब) अन्वये तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.
चिखली (Chikhali Police Enforcement) : चिखली शहरातील आठवडी बाजार परिसरातील सुनील उर्फ लाला हिरालाल चुनावाले (वय 50) याच्यावर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 56(1)(अ)(ब) अन्वये तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी, बुलडाणा यांच्या 27 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार सुनील चुनावाले यास बुलडाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यानुसार 10 जून रोजी चिखली पोलिसांनी सदर आदेशाची अंमलबजावणी केली.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे व रुपाली उगले यांनी कारवाई पार पाडली. (Chikhali Police Enforcement) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.