Mama Tiger Attack: चंद्रपूर - मूल मार्गावर मामा नावाच्या पट्टेदार वाघाने गाईची शिकार केली. रविवारी दुपारी घटना घडली, व्हिडीओ व्हायरल झाले. शेतकरी राजेंद्र वाढईचे नुकसान.
चंद्रपूर (Mama Tiger Attack) : चंद्रपूर - मूल मार्गावर असलेल्या जानाळा गावाजवळ रविवारी भरदुपारी मामा नावाच्या पट्टेदार वाघाने गाईची शिकार केली. यानंतर वाहनांच्या वर्दळीतून रस्ता पार करीत गायीला ओढत जंगलात घेऊन जाताना अनेक प्रवाशांनी बघितले. रविवारी घडलेल्या या (Mama Tiger Attack) घटनेची व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले. वाघाने केलेल्या शिकारीचे अनेकांनी लाईव्ह दर्शन घेताना चार चाकी वाहनातून उतरून थेट रस्त्यावर उतरून जीव धोक्यात टाकण्याचा उद्दामपणा केला. आगडी येथील शेतकरी राजेंद्र वाढई यांच्या मालकीची गाय वाघाने (Mama Tiger Attack) ठार केल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.