Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर

Chakan MIDC

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर सरकारचे मोठे निर्णय; 31 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवणार

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्येवरून निर्माण झालेला वाद आता सरकारच्या पातळीवर पोहोचला आहे.


चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर सरकारचे मोठे निर्णय 31 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवणार

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म उपाययोजना; दहा महिन्यांत अपेक्षित कामे पूर्ण करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्येवरून निर्माण झालेला वाद आता सरकारच्या पातळीवर पोहोचला आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे जवळपास 20 लघुउद्योगांनी उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणचा दौरा करून उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

चाकण परिसरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी विविध निर्णयांची माहिती दिली. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांसाठी शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म अशा तीन टप्प्यांत उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वात तातडीच्या उपाययोजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत परिसरातील सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी RMCसारख्या मटेरियलचा वापर केला जाणार आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही सामंत यांनी दिला.

चाकणमधील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही बैठकीत चर्चेत आला. यासाठी सरकारकडून जागा उपलब्ध करून दिली जाणार असून PMRDAकडून त्यासंदर्भात टेंडर काढले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

या संपूर्ण कामकाजाच्या समन्वयासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. MIDC, PMRDA, PWD आणि NHI या चार विभागांमध्ये ते समन्वय साधतील. रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित कामांसाठी जिल्हाधिकारी समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रुंदी तीन मीटरने वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच सब-स्टेशनची क्षमता वाढवण्यात येणार आहे. PWAकडे असलेल्या 59 कोटी रुपयांच्या रस्त्याचे कामही हाती घेण्यात आले असून रात्रीच्या वेळी खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.

ट्रक टर्मिनलची व्यवस्था करण्यात आली असून MIDCकडून हॉस्पिटलसाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संबंधित मंत्री स्वतः चाकणमध्ये येऊन बैठक घेणार असून त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. चाकणमधील प्रश्नांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी दर शुक्रवारी बैठक घेणार आहेत. गरजेनुसार उद्योगमंत्री उदय सामंतही या बैठकीला उपस्थित राहून आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उद्योजकांच्या अपेक्षेनुसार आवश्यक असलेली सर्व कामे आजपासून पुढील दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कामांचा प्रगतीआढावा दर दोन महिन्यांनी घेतला जाणार असल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: