Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

जनगणना २०२६

जनगणना २०२६: शिक्षकांना अर्जित रजेसह साधनसामग्री द्या

Census 2026: आगामी २०२६ च्या जनगणनेसाठी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत


जनगणना २०२६ शिक्षकांना अर्जित रजेसह साधनसामग्री द्या

Census 2026 |

प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य जनगणना प्रमुखांना निवेदन; वैयक्तिक मोबाईल सक्तीला विरोध

अमरावती (Census 2026) : आगामी २०२६ च्या जनगणनेसाठी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. हे कार्य व्यापक आणि वेळखाऊ असल्याने शिक्षकांना ३५ ते ४० दिवसांची अर्जित रजा मंजूर करावी तसेच कामासाठी स्वतंत्र डिजिटल साधने पुरवावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. यासंदर्भात समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी राज्य जनगणना प्रमुखांना निवेदन दिले आहे.अशी माहीती राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.

शिक्षण सेवक सध्या केवळ १६ हजार रुपये मानधनावर काम करत आहेत. जनगणनेच्या कामादरम्यान दुर्गम भागात किंवा प्रवासात दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणताही आर्थिक आधार नसतो. त्यामुळे त्यांना किमान २० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि विमा सुरक्षा कवच द्यावे. तसेच त्यांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळ पाहता विशेष आर्थिक भत्ता देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीत (Census 2026) जनगणनेचे काम करून घेतले जाणार असल्यास, त्या बदल्यात शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत अर्जित रजा जमा करणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले.

मोबाईल सक्तीला विरोध

चालणार जनगणनेचे (Census 2026) काम प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने असल्याने शासनाने कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड टॅब, इंटरनेट डेटा पॅक आणि चार्जिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. वैयक्तिक मोबाईल हा शिक्षकांच्या खाजगी जीवनाचा भाग असून, त्यात बँक खाती आणि गोपनीय माहिती साठवलेली असते.

प्रमुख मागण्या:

  • उन्हाळी सुट्टीत काम करणाऱ्या शिक्षकांना ३५ ते ४० दिवसांची अर्जित रजा मंजूर करावी.
  • शिक्षण सेवकांना २० लाख रुपये सानुग्रह अनुदान व विमा संरक्षण द्यावे.
  • इंटरनेट सुविधा पुरवावी. ऑनलाइन माहिती संकलनासाठी शासनाने स्वतंत्र टॅब
  • जनगणनेच्या कामासाठी येणारा प्रवास खर्च पाहता विशेष आर्थिक भत्ता तात्काळ अदा करावा

Related to this topic: