Sarpanch Devabhau Dandge : सागवान गावातील सुमारे २५ हजार नागरिकांना पाणीटंचाईची झळ लागू नये, यासाठी प्रशासकीय कार्यकाळात सरपंच देवाभाऊ दांडगे यांनी रात्रंदिवस मेहनत घेत प्रभावी पाणीपुरवठा व्यवस्थापन
२५ हजार नागरिकांना जाणवू दिली नाही पाणीटंचाईची झळ!
बुलढाणा (Sarpanch Devabhau Dandge) : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मात्र सागवान गावातील सुमारे २५ हजार नागरिकांना पाणीटंचाईची झळ लागू नये, यासाठी प्रशासकीय कार्यकाळात सरपंच देवाभाऊ दांडगे यांनी रात्रंदिवस मेहनत घेत प्रभावी पाणीपुरवठा व्यवस्थापन केले.
आ. संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन देवाभाऊ दांडगे (Sarpanch Devabhau Dandge) यांनी गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. सागवान गावातील सुमारे पाच हजार नळजोडण्यांद्वारे होणारा पाणीपुरवठा अखंडित राहावा, यासाठी येळगाव धरणावरील तीन विहिरींची त्यांनी स्वतः सातत्याने देखरेख केली. मध्यरात्री मोटार, पंप किंवा केबलमध्ये बिघाड झाल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीची कामे पूर्ण केली. पिण्याचे पाणी स्वच्छ राहावे यासाठी ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या कामावरही त्यांनी स्वतः लक्ष ठेवले.
या काळात संसर्गजन्य आजारामुळे त्यांना दोन दिवस उपचारासाठी बुलढाण्यात दाखल व्हावे लागले. मात्र उपचार सुरू असतानाही त्यांनी मोबाईलद्वारे ग्रामविकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून पाणीपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली. गावातील फुटलेल्या पाईपलाईन, व्हॉल्व्ह लिकेज यांची स्वखर्चातून दुरुस्ती करून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय रोखण्यात आला. तसेच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन चार नवीन बोअरवेल उभारण्याचीही पुढाकाराने व्यवस्था करण्यात आली. सध्या पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन सुरू असून, नागरिकांना सातव्या ते आठव्या दिवशी नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे (Sarpanch Devabhau Dandge) देवाभाऊ दांडगे यांनी सांगितले.
आ. संजय गायकवाड यांची जनतेसाठी असलेली तळमळ आम्ही सातत्याने पाहत आलो आहोत. त्यांच्या मार्गदर्शनातूनच लोकहितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. सागवानच्या प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणी पोहोचविण्यासाठी आणखी सक्षम नियोजन करण्यात येत असून, सातव्या ते आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
- देवाभाऊ दांडगे, सागवान