ShivSena-Dharmaveer Youth Foundation: बुलढाणा जिल्ह्यातील अचालित समस्यांसाठी धार्मवीर युथ फाउंडेशन व शिवसेनाचे नेते आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रबळ जनआंदोलन सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारीने आश्वासन
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते उपोषणाची सांगता; आ. गायकवाड यांचा पुढाकार!
बुलढाणा (ShivSena-Dharmaveer Youth Foundation) : जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना, वाळू व गोतस्करी, जुगार अड्डे तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना व धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची गुरुवारी लेखी आश्वासनानंतर सांगता करण्यात आली. प्रशासनाने १४ प्रमुख मागण्या मान्य केल्याने अप्पर जिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्याहस्ते पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून उपोषण सोडण्यात आले.
या आंदोलनात (ShivSena-Dharmaveer Youth Foundation) धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, युवानेते तथा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, युवक तसेच नागरिकांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने १४ मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.
अप्पर जिल्हाधिकारी सुरेश कव्हळे व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या स्वाक्षरीचे आश्वासनपत्र पृथ्वीराज गायकवाड, मृत्युंजय गायकवाड, विजय अंभोरे, ओमसिंग राजपूत, बबलू मावतवाल, नयन शर्मा आणि विजय जायभाये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर उपोषणाची अधिकृत सांगता करण्यात आली. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन..
धर्मवीर युथ फाऊंडेशनचे (ShivSena-Dharmaveer Youth Foundation) संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांचे वेळेत पालन झाले नाही किंवा १४ मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, तर शिवसेना व धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा आमरण उपोषणासह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.