Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

बुलढाणा वादळी पाऊस

वादळी वाऱ्याचा फटका; चांदूर बिस्वा–जिगाव मार्गावर दोन मोठी झाडे कोसळली..

Buldhana Torrential Rain: नांदुरा तालुक्यात आज सकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चांदूर बिस्वा ते जिगाव मार्गावर दोन मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप


वादळी वाऱ्याचा फटका चांदूर बिस्वा–जिगाव मार्गावर दोन मोठी झाडे कोसळली

Buldhana Torrential Rain |

 

रस्ता वाहतुकीसाठी बंद; एसटी बससह प्रवासी अडकले, शेतातून काढला मार्ग

बुलढाणा (Buldhana Torrential Rain) : नांदुरा तालुक्यात आज सकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चांदूर बिस्वा ते जिगाव मार्गावर दोन मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

रस्त्यावर झाडे आडवी पडल्याने नांदुरावरून जिगावकडे जाणारी एसटी बसही मार्गात अडकून पडली. बसमधील प्रवासी तसेच इतर वाहनधारक काही काळ रस्त्यावरच खोळंबून राहिले. (Buldhana Torrential Rain) परिस्थितीमुळे अनेक प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. काही नागरिकांनी शेतातून मार्ग काढत आपल्या गावाचा रस्ता धरला.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. मात्र अचानक आलेल्या (Buldhana Torrential Rain) वादळी पावसामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आणि परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.

दरम्यान, संबंधित यंत्रणेकडून रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.