Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

बुलढाणा RTO अधिकारी

रस्त्यावरचे देवदूत ठरले बुलढाणा RTO अधिकारी-कर्मचारी

Buldhana RTO Officer: बुलढाणा RTO कर्मचार्यांनी चिखली येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर माजी नगरसेवक सुभाष आप्पा झगडे यांच्या जीवनाला वेळेवर वाचवले.


रस्त्यावरचे देवदूत ठरले बुलढाणा rto अधिकारी-कर्मचारी

Buldhana RTO Officer |

अपघातग्रस्त माजी नगरसेवकाला दिले जीवनदान

चिखली (Buldhana RTO Officer) : अंचरवाडी फाटा येथे दुपारच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत चिखली येथील माजी नगरसेवक सुभाष आप्पा झगडे हे गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत होता… आणि अशा निर्णायक क्षणी बुलढाणा RTO कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जणू रस्त्यावरचे “देवदूत” ठरले.

अपघाताची माहिती मिळताच RTO कार्यालयाच्या (Buldhana RTO Officer) आदेशाने समृद्धी पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या वाहनातून जखमी झगडे यांना तात्काळ दे-मही येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या प्रकृतीवर तातडीने उपचार सुरू होऊ शकले. यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांच्या मुलगा योगेश झगडे यांनी जालना येथील कलानाथ रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.

या संपूर्ण प्रसंगात समृद्धी पथकातील सुरेखा सपकाळ (समोवानी), चालक समाधान सोनूने तसेच नंदू पाटील यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरली. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, अपघाताच्या क्षणी घेतलेला तातडीचा निर्णय एखाद्याचे जीवन वाचवू शकतो. बुलढाणा RTO कार्यालय आणि त्यांच्या समृद्धी पथकाने दाखवलेली ही मानवतावादी भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, “सेवेतूनच समाधान” या भावनेला खरं रूप दिलं आहे.

Related to this topic: