Borkhedi Cemetery: बोरखेडी येथे स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला, प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतली नाही. गावाला स्मशानभूमीची अत्यंत आवश्यकता आहे.
प्रशासणाकडुन स्मशानभुमी निवेदनाचे निवेदनाची बेदखल
रिसोड (Borkhedi Cemetery) : स्मशानभूमी' ही राज्य शासणाची योजना तालुक्यातील बोरखेडी येथे पुर्णपणे फोल ठरल्याने गावासाठी सार्वजनिक स्मशानभूमी अत्यंत आवश्यक आसल्याचे सांगत शेकडो ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्ष-याचे निवेदन दिले. परंतु गावहीताच्या या विकास कामाकडे संबंधित ग्रामपंचायतव प्रशासणाने कुठलीच दखल घेतली नसल्याने अखेर ता.10 एप्रिल पासुन स्थानिक ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
तालुक्यातील बोरखेडी येथील एका युवकाने गावाच्या हक्काच्या स्मशानभूमी साठी शासणदरबारी कागदोपत्री पाठपुरावा केला.गावाला स्मशानभूमीची अत्यंत गरज आसल्याची बाब ग्रामसथांच्या निदर्शनात येताच सदर युवकाला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला. सदर निवेदनाची दखल ना ग्रामपंचायत ने,ना पंचायत समिती प्रशासनाने घेतली नसल्याने अखेर कडुजी रामभाऊ आघाव यांनी ता.10 एप्रिल पासुन स्थानिक ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
या (Borkhedi Cemetery) उपोषणाला ओबीस संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दिपक बुधवंत,विश्वनाथ पालवे,विलास डोईफोडे,यांच्यासह.मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. बोरखेडी.गावाला स्मशानभूमीची अत्यंत गरज आहे. येथिल मृतदेहावर रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार उरकण्यात येतात. ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब आसल्याने कडुजी आघाव या युवकाने अखेर स्मशानभूमी निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत तथा प्रशासणाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. गावाला मोठ्या प्रमाणात ई-क्लास,गायरान जमिन उपलब्ध होती. परंतु गावातीलच काही नागरिकांनी त्या ई-क्लास, गायरान जमिनीवर ताबा मिळविला आहे.या जागेवर कुठेतरी ग्रामस्थांना हक्काची स्मशानभुमी बनविण्याची मागणी उपोषण कर्त्यांची आहे.
दिपक किसनराव बुधवंत (ओबीस संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष)
गावाला स्मशानभूमीची (Borkhedi Cemetery) अत्यंत आवश्यक्ता आहे.सदर युवकाने प्रशासना विरोधात आमरण उपोषणाला प्रारंभ केला असून, या उपोषणाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सुध्दा पाठींबा दिला आहे.याची दखल प्रशासणाने घेण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.