Vinod Khatke: रक्तदान शिबिरात 86 जणांनी रक्तदान केले. तसेच नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिरात 132 जणांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली.
लातूर (Vinod Khatke) : व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त चाकूर येथे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रक्तदान शिबिरात 86 जणांनी रक्तदान केले. तसेच नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिरात 132 जणांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाढदिवसानिमित्त केक कापून विनोदभाऊ खटके यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके (Vinod Khatke) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ८६ रक्तदात्यांनी रक्तदान करून विनोदभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये 132 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये 17 रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशन साठी लातूरला पाठवण्याचे ठरले. विनोदभाऊ खटके यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा करत असताना लातूर जिल्ह्यातील रुग्णांना रक्तपुरवठा करता यावा तसेच चाकूर तालुक्यातील वृद्ध लोकांची दृष्टी सुधारावी, यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शरद किनीकर आणि तालुकाध्यक्ष अजय वाघमारे यांनी दिली.
या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिनभाऊ मस्के, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, संपर्कप्रमुख आनंद जाधव, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रीतम दंडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे, शहराध्यक्ष असदभाई शेख,उ कामगार आघाडी अध्यक्ष गौस शेख यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांचा तालुका शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. रक्तसंकलनासाठी भालचंद्र ब्लड बँकेला पाचारण करण्यात आले होते तसेच नेत्ररोग शिबिरासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग विभागातील पथक शिबिरा स्थळी उपस्थित होते.
यावेळी चाकूर तालुका शाखेच्या वतीने भालचंद्र ब्लड बँकेच्या तसेच नेत्ररोग विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष शरद किनीकर मार्गदर्शक माधव कांबळे तालुका अध्यक्ष अजय वाघमारे सिद्धार्थ किनिकर शहर अध्यक्ष विक्रम कांबळे सचिव गजानन कांबळे, तालुका उपाध्यक्ष केतन कांबळे, शादुल शेख, इस्माईल पठाण, मिलिंद कांबळे, संगम डोंगरे, शैलेश महालिंगे, रणवीर कांबळे, गजानन गायकवाड, समाधान गायकवाड, जयचंद कांबळे, रोहित कांबळे, नरेंद्र गोलावार, अनुज कांबळे, महादेव गायकवाड, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.