Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > मुंबई

BJP National Executive

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल; शिंदेंनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली

​​​​​​​एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.


भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल शिंदेंनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; डॉ. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली नंदनवनमध्ये बैठकीकडे लक्ष

एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातही हालचाली वाढल्या असून एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणती चर्चा होणार आणि पक्षाकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाने राज्यात राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’दरम्यान ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती समोर आली होती. या राजकीय घडामोडीनंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा यापूर्वी सुरू होती. मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील नेत्यांमध्येही उत्सुकता आणि अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. सुरुवातीला केंद्रातील विस्तारात भाजपसोबत अजित पवार गटालाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदारांची मुंबईतील नंदनवन येथे तातडीची बैठक आयोजित केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यानच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. मात्र, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यामुळे हा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, आज सायंकाळी सहा वाजता मुंबईतील आजी-माजी आमदार आणि खासदारांचीही बैठक होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणते मुद्दे मांडले जातात आणि पक्षांतर्गत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बैठकीत पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत काही बदलांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबईतील आगामी राजकीय समीकरणे आणि जेनझी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांना काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

Related to this topic: