Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

भाजप युवा मोर्चा नांदेड

भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर

BJP Yuva Morcha Nanded: भारतीय जनता पार्टी (भाजप)चे नांदेड महानगर युवा मोर्चा २०२६चे नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आले.


भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर

BJP Yuva Morcha Nanded |

 

शशिकांत क्षीरसागर यांच्या नेतृत्वात नवी टीम मैदानात

नांदेड (BJP Yuva Morcha Nanded) : भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड अंतर्गत 'युवा मोर्चा'ची वर्ष २०२६ ची अधिकृत जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे महानगरजिल्हाध्यक्ष माजी. आ. अमरनाथ राजूरकर आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पा. क्षीरसागर यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि युवकांचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.

​नव्या कार्यकारणीमध्ये युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत क्षीरसागर असून, त्यांच्यासोबत सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि चिटणीस पदांवर जिल्ह्यातील कार्यतत्पर युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत यादीनुसार नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत.यात ​सरचिटणीस पदी ओम बंडेवार,प्रियेश ठाकूर,करन चव्हाण,शिवा लोट,​उपाध्यक्ष पदी विशाल संपतवार,अक्षय पवार,शुभम खोडके, मारोती जाधव,माधव शिरसाठ,बालाजी काळे, निखील पुरी,सुजलसिंग फौजी, बालाजी बोकारे,आसिफ शेख,बलदीप यादव,प्रताप पाटील,पवीतसिंग आरतीया, किरण पारधे,पार्थ देशमुख,अध्ययन तेहरा,अर्चितसिंग चौधरी,सुशील यादव, विजय यादव,विक्रांत पार्डीकर,​चिटणीस पदी मोहसीन शेख,अर्जुन कोकाटे, गजानन कदम, बालाजी गंजेवार, युवराज शिंदे, विशाल गिरी,प्रेम वीर, अभिनव कुलकर्णी, लखन उमरीकर,पार्थ शर्मा, प्रथमेश चौधरी,सचिन नरंगले, बालाजी गंजेवार, सतीश हातागळे, शिवा धुमाळ, शिवा कांबळे,शुभम महाजन, तानाजी चव्हाण, महेश कुलकर्णी,अजय यादव, प्रदीप मस्के,संतोष कोकाटे, लेखराज शिंगणकर आदींची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

यामुळे ​युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या नूतन कार्यकारणीमध्ये सर्वसमावेशक आणि वेगवेगळ्या भागातील सक्षम कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या निवडीबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांमुळे नांदेड शहरात भाजप युवा मोर्चाची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Related to this topic: