सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी जल्लोष साजरा करण्यात आला.
खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड (BJP Foundation Day) : सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी जल्लोष साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या नांदेड दक्षिण जिल्हा कार्यालयात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला.गांधी पुतळ्या जवळील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या सोहळ्यास जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, महापौर कविताताई मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकाराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या 46 वर्षांच्या प्रगतीची माहिती दर्शविणारी प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यानिमित्त मध्यवर्ती कार्यालयाची सजावट करून भव्य रोषणाई करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित त्यांना मिठाई वाटप करण्यात आली.या कार्यक्रमास , प्रवीण साले,सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, माणिकराव लोहगावे नंदकुमार कुलकर्णी, बालाजीराव देशपांडे , एल.के. कुलकर्णी,मोहन सिंह तोर, प्रभाकर पेटकर, महेश बाळू खोमणे,नगरसेवक अभिषेक सौदे, आशिष नेरलकर, सुमित मुथा,नगरसेविका शांभवी साले,सौ अमृताताई परिहार सौ ज्योतीताई कल्याणकर, , बजरंग परिहार, डॉ. बालाजीराव गिरगावकर, बालाजी बच्चेवार, सचिन पाटील उमरेकर, निरंजन पाटील कोडगावकर, मनोहर पवार, बालाजी मद्देवाड , संतोष पाटील मुळे, बालाजी पाटील शेळगावकर, शंकर मनाळकर, जयप्रकाश येवले, शैलेंद्र ठाकूर, हरभजन सिंग पुजारी, गुरप्रीत सिंग सोखी, गुरुदीप सिंग संधू, केदार नांदेडकर, बाबुराव सुंकेवार, शिवशंभ देशमुख, राजेश केंद्रे, हरीश भाई ठक्कर, राज यादव, दीपक सिंह ठाकुर, सदाशिव कल्याणकर, सौ मानिनी नांदेडकर, गजानन उबाळे, निरंजन चव्हाण, किशनराव कल्याणकर, शंकरराव काळे, सुधीर हंबर्डे. यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटन वाढीवर भर-जिल्हाध्यक्ष हंबर्डे
भाजपा स्थापना दिनानिमित्त ६ ते १२ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचा इतिहास, पक्षाची ध्येय धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, कार्यकर्त्यांशी चर्चा, आदी कार्यक्रम होणार असून पक्ष संघटन वाढीवर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी दिली.