नागपूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू
नागपूर (Bird Flu Alert) : नागपूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शासकीय अंडी उगवण केंद्रात या संसर्गाची नोंद झाली असून तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत.
प्रशासनाने संबंधित परिसरात 1 किमीचा सॅनिटेशन झोन आणि 9 किमीचा सर्व्हिलन्स झोन जाहीर केला आहे. बाधित पक्ष्यांचे वैज्ञानिक पद्धतीने कलिंग (culling) करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 30 ते 40 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
सर्व्हिलन्स झोनमध्ये नमुने गोळा करून तपासणी सुरू असून, सध्या तरी इतर ठिकाणी संशयास्पद लक्षणे आढळून आलेली नाहीत. पशुसंवर्धन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, SOPनुसार सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.