Bhumiputra Farmers Association: या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि शेतकऱ्यांप्रती सहवेदना समर्पित करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग आंदोलन
रिसोड (Bhumiputra Farmers Association) : भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग आंदोलन केले जाते. व्यवस्थेने दखल घेतलेली पहिली शेतकरी आत्महत्या 19 मार्च 1986 ला झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबाने कर्जबाजारीपणा आणि समाजाचे व व्यवस्थेचे प्रचंड दुर्लक्ष यामुळे सहकुटुंब आत्महत्या केली होती. तेव्हापासून आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या (Bhumiputra Farmers Association) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि शेतकऱ्यांप्रती सहवेदना समर्पित करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग आंदोलन करीत असते. याही वर्षी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून राज्यभर अन्नत्याग आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे (Bhumiputra Farmers Association) संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वामध्ये रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सकाळी बारा वाजता सुरू झालेले अन्न त्याग आंदोलन सायंकाळी चार वाजेपर्यंत चालले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भूमिपुत्र कडून श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर निवेदन तयार करण्यात आले असून हे सरकारला पाठवले जाणार आहे.
अन्न त्याग आंदोलनासाठी (Bhumiputra Farmers Association) डॉक्टर जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवचार, निवासी जिल्हाध्यक्ष संतोष सुर्वे, सचालक रवींद्र चोपडे, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पाटील बोरकर, रिसोड चे तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, गजानन जाधव, अमर दहीहंडे, गजानन पाटील सदार, वैजनाथ रंजवे, रवी पाटील जाधव, महावीर सिंह ठाकुर, विशाल मोरे, किशोर लाड, संतोष गव्हाणे, हरिभाऊ बाजाड, शंकर सदार, विठ्ठल मडके यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.