Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > पुणे

Bharati Vidyapeeth Police Station

पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला शिपायासोबत गैरवर्तन; हवालदार किरण देशमुख निलंबित

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतीलच एका घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला शिपायासोबत गैरवर्तन हवालदार किरण देशमुख निलंबित

Bharati Vidyapeeth Police Station |

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील प्रकार; तक्रारीच्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर पोलीस उपायुक्तांची कारवाई

पुणे : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतीलच एका घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या पोलीस हवालदार किरण दत्तात्रय देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर देशमुख दोषी आढळल्याचे समोर आले आहे.

किरण दत्तात्रय देशमुख हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे लेखनिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यातीलच एका महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन केल्याबाबत तक्रारीचा अर्ज प्राप्त झाला होता.

या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती किरण देशमुख हे दोषी आढळल्याने पोलीस उपायुक्तांनी त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महिला कर्मचाऱ्याने पुढे येऊन तक्रार केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत कारवाई केल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. पोलीस ठाण्यासारख्या ठिकाणीच महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याने या घटनेबाबत सर्वसामान्यांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणातील पुढील तपास आणि संबंधित बाबींची चौकशी सुरू असून, पोलिस विभागाकडून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

 

Related to this topic: