Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आमदार बळीराम पाटील कोटकर

भाजपचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन

MLA Baliram Patil Kotkar: भाजपचे माजी आमदार आणि हिंगोलीचे पहिले आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ८८ वर्ष होते.


भाजपचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन

MLA Baliram Patil Kotkar |

हिंगोली (MLA Baliram Patil Kotkar) : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर  यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय (८८) होते. भानखेडा शिवारात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली.

‘बापू’ या टोपण नावाने ओळखले जाणारे बळीराम पाटील कोटकर (MLA Baliram Patil Kotkar) हे भारतीय जनता पक्षाचे हिंगोली विधानसभेचे पहिले आमदार होते. १९९० आणि १९९५ च्या दोन विधानसभा निवडणुका त्यांनी सलग जिंकल्या. हिंगोली जिल्हा निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात त्यांनी शासन दरबारी अत्यंत आग्रही भूमिका मांडली होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे मतदार संघात खोलवर रुजली. १९९९ नंतर काही वर्षे ते पक्षात सक्रिय राहिले. २००४ मध्ये हिंगोली विधानसभेची जागा शिवसेना भाजपच्या युतीमध्ये शिवसेनेला मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे माजी खासदार अ‍ॅड. शिवाजी माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या बळीराम पाटील कोटकर यांनी कपबशी या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढविली.

या निवडणुकीत युतीचे उमेदवार असलेल्या शिवाजी माने यांना ३१ हजार ९०० मते मिळाली तर बळीराम पाटील कोटकरांना २९ हजार ९४ मते मिळाली होती. बापूंच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांना दुसर्‍यांदा आमदारकीची संधी मिळाली. पुढील काळात बळीराम पाटील कोटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. तेथे त्यांचे मन फार काळ लागले नाही. पुढे ते परत भारतीय जनता पक्षात गेले. सध्या त्यांचे नातू ओम पाटील कोटकर हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सलग दहा वर्षे आमदार असूनही साधेपणा जपणारे एक प्रामाणिक व निर्व्यसनी नेता अशी त्यांची ओळख आहे. हिंगोली विधानसभेत मोठी संख्या असलेला दखनी मराठा समुदाय त्यांच्यामुळेच भारतीय जनता पक्षाशी जोडला गेला त्यांच्या या सोशल इंजिनिअरिंग मुळेच भाजपची हिंगोलीत मोठी ताकद निर्माण झाली.  

दरम्यान माजी आ. बळीराम पाटील कोटकर (MLA Baliram Patil Kotkar) यांच्या पार्थीव देहावर गुरूवारी दुपारच्या सुमारास भानखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत आ. तान्हाजीराव मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक मस्के, डॉ. विठ्ठल रोडगे, नारायण खेडेकर, हरिशचंद्र शिंदे, किसनराव तांबिले, यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरीकांची उपस्थिती होती. बळीराम पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, वहिणी, नातू,  पुतणे असा परिवार आहे.

कै. गोपीनाथ मुंढेंशी होती जवळिकता

१९९५ मध्ये बळीराम पाटील कोटकर पहिल्यांदा आमदार झाले. त्याचवेळी राज्यात शिवसेना - भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले कै. गोपीनाथ मुंढे यांची बापुवर खास मर्जी होती. जिल्हा निर्मितीचे आंदोलन शिखरावर असताना हिंगोलीकरांच्या शिष्टमंडळाची कै. गोपीनाथ मुंढे यांच्याशी बापूंनी भेट घालून दिली होती. त्यावेळी मिश्कीलपणाने गोपीनाथ मुंढे म्हणाले ‘मला बळीराम पाटलांचे ऐकावेच लागेल, ते रूसले कि थेट राजीनामाच घेऊन येतात’ त्यानंतर १९९९ मध्ये कार्यकाळ पुर्ण होण्या आधी युती सरकारने हिंगोली जिल्हा जाहीर केला.

Related to this topic: