Balaji Urban Credit Society: जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या बालाजी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., चिखलीच्या बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी अंकुशराव पाटील यांची बिनविरोध निवड; अंबिका अर्बनच्या अध्यक्षपदी ॲड. विजय कोठारी
चिखली : जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या बालाजी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., चिखलीच्या वतीने बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. अंकुशराव पाटील पडघान तसेच अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. ॲड. विजय कोठारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक प्रताप मधुकर खरात यांचाही वाढदिवसानिमित्त परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
बालाजी अर्बनच्या स्वा. विनायक दामोधर सावरकर सभागृहात दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकासकन्या सौ. श्वेताताई महाले यांचे वडील मा. अंकुशराव पाटील पडघान यांची बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चिखली शहरातील नामांकित अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत मा. ॲड. विजय कोठारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अर्बनचे अध्यक्ष नारायणराव गणपत खरात होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सत्यनारायण बजरंग लढढा, कार्यकारी संचालक गोपाल गोविंदराव शेटे, माजी अध्यक्ष ॲड. मंगेश हरीभाऊ व्यवहारे, संचालक नारायण देविदास भवर तसेच जुलालसिंग विठोबा परिहार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी संचालक गोपाल गोविंदराव शेटे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांना बालाजी अर्बन परिवाराच्या वतीने सदिच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना ॲड. विजय कोठारी यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये उद्भवू शकणारे संभाव्य धोके तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर सत्कारमूर्ती मा. अंकुशराव पडघाण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा सहकारी बँकेत काही काळ सेवा बजावल्यानंतर त्याच बँकेच्या संचालकपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आपल्या सत्काराबद्दल बालाजी अर्बन परिवाराचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण बजरंग लढढा यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सहायक व्यवस्थापक अशोक नाईक, वरिष्ठ अधिकारी रमेश देशमुख आणि शाखाधिकारी अतुल भोकरदणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.