Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

बोगस बचत गट

बोगस बचत गटांचा शोध घेतांना प्रशासनाची दमछाक

Bogus Bachat Gat: समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील बचत गटांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येत आहे, मात्र बोगस बचत गटांच्या शोधात प्रशासनाची दमछाक.


बोगस बचत गटांचा शोध घेतांना प्रशासनाची दमछाक

Bogus Bachat Gat |

दीड कोटीतून बचत गटांना ट्रॅक्टर

नागपूर (Bogus Bachat Gat) : समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता १ कोटी २७ लाख रुपयांमध्ये बचत गटांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे महिलांच्या बचत गटांना शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री सहज उपलब्ध होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. परंतु, अर्ज करण्यासाठी बोगस बचत गटांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. त्यांचा शोध घेताना प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे.

ग्रामीण भागात अनेक महिला बचत गट शेती, दुग्धव्यवसाय, तसेच लघुउद्योगाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शेतीसाठी लागणार्‍या आधुनिक साधनांची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. ट्रॅक्टरसारख्या महागड्या साधनांची खरेदी करणे सर्वांसाठी शक्य नसल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण होत नव्हती. या पार्श्वभूमीवर समाज कल्याण विभागाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गटांनी अर्ज करणे आवश्यक असून त्यांच्या आर्थिक स्थिती, कार्यक्षमता आणि व्यवसायाचा प्रकार यांचा विचार करून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ट्रॅक्टर मिळाल्यानंतर बचत गट शेतीची कामे स्वतः करू शकतील तसेच इतर शेतकर्‍यांना भाड्याने सेवा देऊन अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकतील.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसेच त्यांच्या आत्मनिर्भरतेत वाढ होईल. शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांवर स्वागत करण्यात येत आहे. अनेक बचत गटांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्साह दाखविला आहे. समाज कल्याण विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात अशा आणखी योजनांच्या माध्यमातून बचत गटांना बळकटी देण्याचा विभागाचा मानस आहे. परंतु, बोगस बचत गटांकडून अर्ज होत असल्याचे सांगितले जात आहे. नोंदणीकृत बचत गटांची फेरतपासणी केली जात आहे. त्यानंतर पहिला हप्ता बचत गटांना दिला जाणार आहे.

समाज कल्याण विभागाकडून १ कोटी ५७ लाखांच्या निधीतून बचत गटांना ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रीया सुरू असून अर्जाची छाननी समितीच्या माध्यमातून सुरू आहे. काही बोगस बचत गटांना योजनेचा लाभ मिळणार नाही. 
-सुकेशनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग 

Related to this topic: