नगरसेवक दिपक वाधवाणी यांच्या पुढाकारातून आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले.
चिखली (Ayushman Bharat Camp) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने प्रभाग क्रमांक ११ व १२ मध्ये आयुष्मान भारत शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक दिपक वाधवाणी यांच्या पुढाकारातून आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले.

शिबिरामध्ये नागरिकांना आयुष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्ड तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण उपलब्ध होत असल्याने गंभीर आजारांवरील उपचारांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याने सामान्य नागरिकांसाठी ही योजना अत्यंत लाभदायी ठरत आहे.
यावेळी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशराव (काका) पडघान, माजी नगरसेवक विलास कंटूले, शहराध्यक्ष सागर पुरोहित, चेतन देशमुख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम सौदागर, सुशीलकुमार जाधव, शरदसेठ भाला, कौसर ठेकेदार, आजम ठेकेदार, सय्यद जुबेर, गजू तारू, राम सुरडकर, विजय गाडेकर, माधव कुलकर्णी, अक्षय शर्मा, रामेश्वर खराबे, मयूर शर्मा, भीमराव तुपसौंदर, राजेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेची माहिती जाणून घेत नोंदणी केली. आरोग्यविषयक शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील शेळके, शुभम राजपूत, दर्शन शर्मा, साकिबभाई, गणेश सुरूशे, मुजीब शेख, ज्ञानेश्वर चव्हाण, नारायण शितोळे, विलास उबरहंडे व संतोष बहिर यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.