Ausha Bus Station: औशा येथील अडचणी बळकावून एकलव्य बसस्थानक निर्माण करण्यात आले तरी, लातूर व सोलापुर मार्गावर जाणाऱ्या बसेस असतांना थांबली नाहीत.
जत आगाराच्या वाहक-चालका विरोधात तक्रार दाखल
औसा (Ausha Bus Station) : कार्यसम्राट आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या प्रयत्नातून औसा येथे मराठवाड्यातील नंबर एकचे बस स्थानक बांधून दिले असले तरी त्याचा लाभ मात्र औशाच्या प्रवाशांना होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक बसेस औसा बस स्थानकात येतच नसल्यामुळे औसा येथील प्रवाशांचे हाल होत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या प्रयत्नाने औसा येथे नवीन सुसज्ज बस स्थानक निर्माण केले आहे. परंतु सोलापूर व हैदराबाद या मार्गावर जाणाऱ्या बसेस औसा बस स्थानकात येत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशाच्या माध्यमातून येत आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या (Ausha Bus Station) बसस्थानकाचा प्रवाशांना काय फायदा असा प्रश्न प्रवाशातून विचारला जात आहे. याबाबत 3 ऑगस्ट रोजी आगारप्रमुख औसा यांच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली असून दुपारी दोनच्या सुमारास लातूरहून जत कडे जाणारी बस (क्रमांक एम एच 10 / डी टी 3297) या बसच्या चालक व वाहकांनी महिलांशी गैरवर्तणूक करून बस औसा जात नाही. तुम्ही खूप शहाणे आहात का? आमची बस औशामध्ये जात नाही. तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा!' अशा भाषेत बोलून महिलांचा अपमान केला. इतकेच नाही तर काही महिलांना हाताला धरून बसच्या खाली ढकलून देण्यात आले. यातील काही महिलांना दुखापत पण झाली. परंतु काही महिला तसेच बसमध्ये बसल्या आणि वाहक चालकाला नाविलाजास्तव बस औसा बस स्थानकात आणावी लागली. येथे आल्यानंतर पण बस चालक व वाहक महिलांना वाईट हेतूने व असभ्य भाषेत बोलत होते.
याबाबत औसा आगार प्रमुख शंकर स्वामी यांच्याकडे महिलांनी रीतसर तक्रार केली आहे. याबाबत औसा आगार प्रमुख शंकर स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, औसा स्थानकात अनेक आगाराच्या बसेस येत नाहीत. याचा फटका खुद्द मला बसला आहे. लातूरहून औशाकडे येताना मला बसमध्ये बस औशात जात नाही, म्हणून संबंधित बसच्या बस चालक व वाहकाने सुनावले. यावेळी मी त्यांना औशाला आगार प्रमुख आहे, बस का आत आणत नाही? असे म्हणल्यानंतर 'हो साहेब, बस औशात जाते', असे सांगितल्याचा किस्सा स्वामी यांनी सांगितला.
दरम्यान अनेक बसेस ह्या औसा बस स्थानकात येत नाहीत. तसेच लातूरहून संध्याकाळी सात वाजता लातूर माकणी ही बस गेल्यानंतर औशाला कोणतीही बस नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. औसामार्गे अनेक बसेस जात असतानाही केवळ बस चालक व वाहकाच्या मनमानीमुळे औसा येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आमदारांनी लक्ष घालावे!
याबाबत बस स्थानकामध्ये तक्रारी देऊनही त्याचा फारसा उपयोग होत नाही. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी लक्ष घालून सोलापूर व हैदराबाद या मार्गे जाणाऱ्या सर्व बसेस औसा बस स्थानकामध्ये थांबतील व लातूरहून प्रवाशांना त्या बसेसमध्ये घेतले जाईल, याबाबत सूचना देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.