Ausa Nath Sansthan: औसा नाथ संस्थेत श्री रवीनाथ मल्लनाथ महाराज यांच्या हस्ते ज्येष्ठमासीच्या उत्सवातील दहीहंडी फोडण्यात सांगीत सण झाली. समारंभात 'पंढरीनाथ भगवान की जय'
हजारो भाविकांच्या उपस्थितीत फोडली दहीहंडी!
औसा (Ausa Nath Sansthan) : येथील नाथ संस्थानमध्ये श्री रवींद्रनाथ मल्लनाथ महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून गोपाळकाल्याने ज्येष्ठमासी उत्सवाची उत्साहात सांगता झाली. 'पंढरीनाथ भगवान की जय', 'सद्गुरु श्री वीरनाथ मल्लिनाथ महाराज की जय', नामघोषात व टाळ मृदंगाच्या विनादात, 'मल्लनाथ गुरु माझी आई, मजला ठाव द्यावा पायी', म्हणत 'गोपाळकाला गोड झाला, गोविंदाने गोड केला', या नामोच्चारात सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शन हा उत्सव पार पडला.
यावेळी श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री बसवंतराय देशमुख, ह.भ.प.श्री ज्ञानराज महाराज, ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज, श्री अनिरुद्ध महाराज यांची विशेष उपस्थिती होती.
सद्गुरु विश्वनाथ मल्लिनाथ महाराज यांच्या उत्सवास दिनांक 26 जून रोजी आरंभ होऊन दररोज श्री च्या पावन समाधीला रुद्राभिषेक महापूजा आरती नैवेद्य संपन्न होऊन परंपरेचे अभंग गाऊन सेवा रुजू करण्यात आली. दररोज हजेरीची कीर्तन, चक्रीभजन, नामसंकीर्तन सोहळा भक्तीभावात संपन्न झाला. यावेळी गहिनीनाथ महाराज यांचेही कीर्तन झाले. शेवटी वाळवंटी खेळ खेळया, फुगडी, खिसबाई खीस दोडका खिस, लहान घोडे मोठे घोडे, छेड्र मेंड्र, झेल बाबा झेला, घुसळण बाई घुसळण गं, फुगडी, भुलई, शेवटी काल्याच्या अभंग गाऊन दही हंडी फोडण्यात आली. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गुरुबाबांकडून शिष्यांना समज...
हे संस्थान पाच पिढ्यांपासून गुरु-शिष्य परंपरा आणि अद्वैत भक्तीचे तत्व जतन करीत आहे. संस्थानातून या गुरु-शिष्य परंपरेच्या गादीचा शिष्य हा ओळखता आला पाहिजे. केवळ माळ घातली आणि एकदा कान फुंकून घेतले, म्हणजेच उपदेश घेतला, म्हणजे मोकळा झाला, असे नाही. त्याने मंत्र घेतल्यानंतर गुरु गादीच्या नित्यनेमाशी बांधील असले पाहिजे. दररोज न चुकता सद्गुरूंनी सांगितलेला मंत्र आणि चक्रीभजनाची उपासना ही केलीच पाहिजे तर तो शिष्य खरा असे सांगून आजपासून चाळीस वर्षांपूर्वी माझे वडील आणि सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी या गुरुगादीच्या सेवेची जबाबदारी आमचे हाती दिली, ती सद्गुरूंच्याच कृपा आशीर्वादाने त्यांनी करून घेतली. या परंपरेचा पाईक म्हणून श्वासापर्यंत या गादीची सेवा घडो, हीच प्रार्थना त्यांच्या चरणी मी करतो, असे श्री गुरुबाबा म्हणाले. उत्सवाच्या सांगता दिनी महाप्रसाद नंतर हजेरीच्या कीर्तनात 'सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी', या अभंगावरील निरुपणात ते बोलत होते.