Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

औसा नगराध्यक्ष

आरक्षण महिलेचे नगराध्यक्ष पुरुष; गाजावाजा करत स्विकारला पदभार!

Ausa Municipal Council President: औसाच्या लोकशाहीतील उलटसुलट चरुचेपासून सुरू झालेल्या महिलांची प्रथम नगराध्यक्षपदाची मागणी. अफसर शेख आणि परवीन शेख यांनी जून १९ रोजी पद स्वीकारली


आरक्षण महिलेचे नगराध्यक्ष पुरुष गाजावाजा करत स्विकारला पदभार

Ausa Municipal Council President |

बी. जी. शेख
औसा (Ausa Municipal Council President) :
औसा शहराची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच सगळीकडे होत असते. शुक्रवारी एक नव्या गोष्टीमुळे चर्चेला उधाण आले आहे. २०२६ च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये औसा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉक्टर अफसर शेख यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता प्राप्त केली होती. या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून महिलेला आरक्षण सुटले होते. निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात नगराध्यक्ष पदाची माळ अफसर शेख यांच्या भगिनी परवीन शेख यांच्या गळ्यात पडली.

अतिशय उत्साहात त्यांचा पदग्रहण समारोह पार पडला.काही महिने उलटले नाही तर एका नवीन चर्चेला सुरुवात झाली.डॉक्टर अफसर शेख नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात होऊ लागली. शुक्रवारी (दिनांक १९ जून) अफसर शेख यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या झालेल्या सोहळ्याला नगरसेवकासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी या पदग्रहण सोहळ्यानंतर शुभेच्छा दिल्या.

लोकशाहीत वेगवेगळ्या नियमावर बोट ठेवून हा पदग्रहण सोहळा झाला असला तरी याची शहरात उलट सुलट चर्चा होत आहे. परवीन शेख या एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या ठिकाणी काम असेल असेही बोलले जात आहे. (Ausa Municipal Council President) उच्चशिक्षित परवीन शेख आहेत, असा प्रचार करून त्यांनी मते मागितली होती. सुशिक्षित असल्याकारणाने शहरातील सूज्ञ मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते.

सर्व काही सुरळीत असताना पदाचा इतका हव्यास अफसर शेख यांना का झाला असावा? तसेही पालिकेत निवडून आलेल्या महिला कारभार पाहत नाहीत तर त्यांचे पती सर्व जबाबदारी अप्रत्यक्षपणे पार करत असल्याचेही बोलले जाते. प्रशासकीय काळानंतर महिलेने सुरळीतपणे कारभार हाताळला होता. मग कोठे "माशी शिंकली" याबाबतीत शहरात चर्चा रंगली आहे.
अध्यक्षपदावर महिला असतानाही निर्णय भूमिका डॉ. अफसर शेख यांचीच होती. असे असताना हा सर्व खेळ का मांडला गेला? या बाबतीत अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.