Breaking News
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!
  • मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
  • बीड नगरपालिकेत राडा! मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी, घटना CCTV मध्ये कैद
  • दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली!
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • सिंधुदुर्ग मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; १५ वाहनं जप्त

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

असोला शिवार मृतदेह

असोला शिवारात आढळला पोहण्यास गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह

Asola Shivar dead body: अंजनवाडीतील धम्मपाल भानुदास घनसावंत हा व्यक्ती पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये गेला असताना वाहून गेला. त्याचा मृतदेह असोला शिवारातील कॅनलमध्ये तरंगताना आढळला.


असोला शिवारात आढळला पोहण्यास गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह

Asola Shivar dead body |

औंढा नागनाथ/ जवळाबाजार (Asola Shivar dead body) : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी शिवारातून वाहणार्‍या कॅनॉल मध्ये  ५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेल्या अंजनवाडी येथील धम्मपाल भानुदास घनसावंत वय ३५ वर्षे या व्यक्तीचा कॅनॉलच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील व्यक्तीचा मृतदेह  ६ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील असोला शिवारातून वाहणार्‍या कॅनल मध्ये तरंगताना आढळून आला.

 धम्मपाल भानुदास घनसावंत हे ५ मे रोजी सकाळी ११ वाजता कॅनॉल मध्ये पोहण्यासाठी गेला होता. कॅनॉल मध्ये उडी घेतली तसाच तो व्यक्ती पाण्यासोबत वाहून गेला. यानंतर ग्रामस्थ व पोलिसांनी त्याचा शोध घेतला यादरम्यान ६मे रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान धम्मपालचा मृतदेह (Asola Shivar dead body) असोला शिवारात कॅनॉल मध्ये पाण्यात तरंगताना आढळून आला त्यानंतर औंढा नागनाथ पोलिसांना माहिती देताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार दिलीप नाईक, जमादार माधव सूर्यवंशी, इमरानोद्दीन सिद्दिकी, अंबादास बेले, अमोल चव्हाणयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह कॅनॉलच्या पाण्यामधून बाहेर काढत जवळा बाजार येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला होता.घटने प्रकरणी अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. जमादार दिलीप नाईक पुढील तपास करत आहे.

Related to this topic: