Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचा गौरव

API Shivsamba Gheware:


हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचा गौरव 

API Shivsamba Gheware |

 

६ शटर फोडीचे गुन्हे उघडकीस आणल्या बद्दल प्रशस्तीपत्र प्रदान

हिंगोली (API Shivsamba Gheware) : वसमत शहरातील शटर फोडीच्या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालणाऱ्या सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब सूर्यकांत घेवारे (API Shivsamba Gheware) यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली यांच्याकडून त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन (भा.पो.से.) यांच्या हस्ते दिनांक १४ मे २०२६ रोजी हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 १० मे २०२६ रोजी वसमत शहर हद्दीत एका दुकानाचे शटर फोडून चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत आरोपीचा शेत-शिवारातून माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता एक-दोन नव्हे तर तब्बल ६ शटरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. 

उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये पो. स्टे. वसमत शहर येथील गु.र.नं. ३०७/२६, १३१/२६, १६१/२६, ८२/२६, ३०८/२६ आणि ३११/२६ या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यातील ९०% मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये ४० हळद कट्टे, १ पिकअप वाहन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल यांचा समावेश आहे. सलग सहा गुन्हे उघडकीस आणून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे वसमत शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

(API Shivsamba Gheware) घेवारे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे ही मोठी यशस्वी कामगिरी पार पडली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांची उपस्थिती होती. सायबर सेलच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.