Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

शिरूरच्या स्मशानात भोजनाची पंगत!

शिरूर ताजबंद येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा व शिरूर ताजबंद ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने शनी अमावस्येनिमित्त स्मशान सहल कार्यक्रम पार पडला.


शिरूरच्या स्मशानात भोजनाची पंगत

Anti Superstition Campaign |

अंनिसची सहल : शनि अमावस्येनिमित्त उपक्रम

लातूर (Anti Superstition Campaign) : शिरूर ताजबंद येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा व शिरूर ताजबंद ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने शनी अमावस्येनिमित्त स्मशान सहल कार्यक्रम पार पडला. यावेळी भोजन आणि व्याख्यान असे कार्यक्रम पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते दिक्कतवार होते. यावेळी अंनिसचे राज्य निमंत्रित सदस्य हरिदास तमेवार, अंनिसच्या राज्य प्रधानसचिव रुकसाना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले तसेच लातूर शहर शाखेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गणेश गोमारे, प्रधान सचिव ज्योती ढगे, शिरूर ताजबंद शाखेचे अध्यक्ष बाबुराव सैदापुरे, कार्याध्यक्ष पांडुरंग चाफेकानडे, प्रधान सचिव प्रा. डॉ. माधव दामाजीवाले, रामकुमार चव्हाण, संग्राम पवार, मंदाकिनी कुमठेकर, माधव वाघमारे, दीपक भराटे, ईश्वर भुतडा, ज्ञानोबा डोंगरे, अनिल ढवळे, बालाजी गुंडरे, एड. आशिष वाघमारे, बाबुराव बडगिरे, धम्मपाल सरवदे, किसनराव सोनटक्के, मारुती घोटरे, नाना कदम इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन गीताने रुकसाना मुल्ला यांनी केली, तर विचारपीठावरील सर्व मान्यवरांचा परिचय हरिदास तम्मेवार यांनी करून दिला. प्रास्ताविक शिरूर ताजबंद शाखेचे कार्याध्यक्ष पांडुरंग चाफेकानडे यांनी केले, तर सूत्रसंचलन बाबुराव सैदापुरे यांनी केले.

स्मशान सहल कार्यक्रमाच्या निमित्ताने लातूर जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले यांनी चमत्काराचे सादरीकरण केले. प्रधान सचिव रुकसाना मुल्ला यांनी “महिला व अंधश्रद्धा” तर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. दशरथ भिसे यांनी “फलज्योतिष” या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

​​​​​​​

चमत्काराच्या सादरीकरणानंतर उपस्थितांसाठी स्मशान भूमीतच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजनानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास अहमदपूर, जळकोट, हंगरगा, सय्यदपूर व शिरूर ताजबंद शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शिरूर ताजबंद ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, लातूरहून शकुंतला ढगे, इमरान सय्यद, कबीर सय्यद यांच्यासह जवळपास 200 ते 250 कार्यकर्ते उपस्थित होते.