Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी लाखो रूपयांचा निधी जाहीर


आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी लाखो रूपयांचा निधी जाहीर

Anti Naxal Operation |

गडचिरोली जिल्ह्यातून नक्षली चळवळ हद्दपार होण्याच्या मार्गावर

गडचिरोली (Anti Naxal Operation): आज १९ मार्च रोजी गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलासमोर ११ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पण करणार्‍या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने लाखो रूपयांचा निधी जाहीर केला आहे.

आज आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यामध्ये कुतुल दलमची डिव्हीसीएम सोनी उर्फ बाली वत्ते मट्टामी (४५) रा. बालेवाडा छत्तीसगड, इंद्रावती एरीया कमिटीची सचिव बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (४०) रा.बोडगा,छत्तीसगड,पश्चिम ब्युरो सप्लाय टिमचा कमांडर सुखलाल बोळगा कोक्सा (३१) रा.काकुर, छत्तीसगड, पश्चिम ब्युरो सप्लाय टिमची पीपीसीएम शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (२८), रा. नागाराम छत्तीसगड, भामरागड दलमची एसीएम यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (६०) रा. गुड्डीगुडम  ता. अहेरी, जि. गडचिरोली, कंपनी क्रमांक १० सदस्य गणेश उलगे कोवासी (२१) रा. हिक्केर ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, कंपनी क्रमांक १० सदस्या मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी (२२ ) रा. मुस्पर्शी छत्तीसगड, कंपनी क्रमांक १० सदस्य धनु दसरु वेळंजे(३८) रा. ताडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली, सँड्रा दलम सदस्या सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (२५) रा. वेलगंड्रा छत्तीसगड, मोबाईल पोलीटिकल स्कुल सदस्य रमेश पांडू मडावी (२८) रा. गोगागुडा छत्तीसगड आणि सँड्रा दलम चा मिलीशिया कमांडर किशोर सुक्रैय्या वासम (३३) रा. सँड्रा छत्तीसगड यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे दिनांक १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण ८९७ माओवादी सदस्यांनी ५४५ शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.

महाराष्ट्र शासनाने सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी हिच्यावर १६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी हिच्यावर १६ लाख,सुखलाल बोळगा कोक्सा याच्यावर ०८ लाख,शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी हिच्यावर ०८ लाख,यमुनक्का रुखमाक्का पोट्टी पेंदाम हिच्यावर ०६ लाख , गणेश उलगे कोवासी याच्यावर ०४ लाख ,मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी हिच्यावर०४ लाख ,धनु दसरु वेळंजे हिच्यावर ०२ लाख , सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम हिच्यावर ०२ लाख  तसेचे रमेश पांडू मडावी याच्यावर ०२ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी हिला एकुण ८.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी हिला एकुण ८.५ लाख,सुखलाल बोळगा कोक्सा याला एकुण ६.५ लाख ,शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी हिला एकुण ०५ लाख ,यमुनक्का रुखमाक्का पोट्टी पेंदाम हिला एकुण ४.५ लाख ,गणेश उलगे कोवासी याला एकुण ०५ लाख,मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी हिला एकुण ०५ लाख ,धनु दसरु वेळंजे याला एकुण ०५ लाख ,सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम हिला एकुण ४.५ लाख,रमेश पांडू मडावी याला एकुण ०५ लाख ,किशोर सुक्रैय्या वासम याला एकुण ०४ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.यामध्ये सुखलाल बोळगा कोक्सा व त्याची पत्नी शांती ऊर्फप सोमरी गंगा तेलामी व   गणेश उलगे कोवासी व त्याची पत्नी मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी यांचा समावेश आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण १० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक  अंकित गोयल,  सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक  अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक  गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक,  अनिकेत हिरडे तसेच पोलीस उप-अधीक्षक  विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.

२०२२ पासून आतापर्यंत १५७  नक्षल्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकूण १५७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन २०२५ पासून आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या ११ माओवाद्यांसहित) एकूण १२३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील यांनी उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले आहे.

Related to this topic: