Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Animal Theft

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा मानोरा पोलिसांकडून पर्दाफाश!

मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे.


आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा मानोरा पोलिसांकडून पर्दाफाश

Animal Theft |

चार आरोपी अटकेत; ५ बकऱ्यांसह ७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

मानोरा : मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या ५ बकऱ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी इर्टिगा कार असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मानोरा पोलीस ठाण्यात बकरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. ग्राम पारवा येथील गुन्ह्याच्या ठिकाणाहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सुझुकी इर्टिगा कारचा शोध सुरू केला. तपासादरम्यान ही कार ब्राम्हणगाव, ता. पुसद येथील सतीष भारत श्रृंगारे (वय २९) याच्याकडे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सतीष श्रृंगारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर करण विनोद राठोड (वय २३), प्रथमेश दिलीप पवार (वय २२) आणि तुषार किशोर जाधव (वय १९), सर्व रा. ब्राम्हणगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ यांना अटक करण्यात आली.

प्रथमेश पवार याच्या घरझडतीत ५ बकऱ्या आढळून आल्या. चौकशीत त्यापैकी तीन बकऱ्या देउरवाडी येथून, तर दोन बकऱ्या पारवा येथून चोरी केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी एकूण ५ बकऱ्या, किंमत अंदाजे ४९ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एमएच २९ सीजे ०९३८ क्रमांकाची इर्टिगा कार, किंमत अंदाजे ७ लाख रुपये, असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींनी आणखी जनावर चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यांची चौकशी व पुढील तपास सुरू आहे. नागरिकांची जनावरे चोरीस गेली असल्यास त्यांनी मानोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर व त्यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि दिनकर राठोड करीत आहेत.

Related to this topic: