Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

अमरावती विद्यापीठ

अमरावती विद्यापीठाच्या संघाने रचला इतिहास

Amravati University: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मौलाना आजाद नॅशनल उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद येथे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केले आहे.


अमरावती विद्यापीठाच्या संघाने रचला इतिहास

Amravati University |

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत प्रथम पारितोषिक

अमरावती (Amravati University) : ऑल इंडिया युनिव्र्हसिटीज्व्दारा आयोजित मौलाना आजाद नॅशनल उर्दू, विद्यापीठ, हैद्राबाद येथे 01 ते 02 एप्रिल, 2026 दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत कला क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठीत प्रथम पुरस्कार (Amravati University) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांच्या संघाने दिमागदार कामगिरीने प्राप्त करून इतिहास रचला आहे. या यशाबद्दल चमूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यापीठ चमूंमध्ये ओम कराळे, अजय हागे, गजानन पळसकर, कल्याणी सावके, आचल सरदार, शर्वरी देशमुख,  ईश्वरी इंगळे, गौरी लढ्ढा, साक्षी वानखडे, गौरी मलथानकर, तर साथीदार म्हणून  तबला वादक हितेश व्यास, ढोलकी वादक कार्तिक नंदवंशी व हार्मोनियम वादक अमर कतोरे तसेच संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. अभिजित अणे व डॉ. राधिका देशमुख यांचा समावेश होता.

विद्यार्थी विकास विभागांतर्गत यावर्षी आयोजित आंतर महाविद्यालयीन (Amravati University) युवा महोत्सव, आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य राज्य स्पर्धा, आंतर विद्यापीठ मध्य विभाग स्पर्धा, आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव तसेच आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली या सर्व स्पर्धेमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.

Related to this topic: