Amravati Orthopedic Association: अमरावती ऑर्थोपेडीक असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवीन अध्यक्ष डॉ. विवेक कावलकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन उपक्रमांची आखणी.
अमरावती (Amravati Orthopedic Association) : अमरावती ऑर्थोपेडीक असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण (इन्स्टॉलेशन) सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ, विविध रुग्णालयांतील डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी मागील कार्यकारिणीने वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांना अधिकृतपणे पदभार देण्यात आला.
असोसिएशनच्या (Amravati Orthopedic Association) अध्यक्षपदी डॉ. विवेक कावलकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी डॉ. अभिजीत कडू, सचिवपदी डॉ. स्वप्नील खाडे, सहसचिवपदी डॉ. गौरव मिलके तसेच कोषाध्यक्षपदी डॉ. नितीन जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. महेंद्र गुढे, डॉ. अनिकेत पोटे, डॉ. योगेश राठोड, डॉ. अनुप विधडे व डॉ. गौरव भूतडा यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन अध्यक्ष डॉ. विवेक कावलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रुग्णांना आधुनिक व दर्जेदार ऑर्थोपेडीक सेवा उपलब्ध करून देणे तसेच नवीन उपचारपद्धतींचा प्रसार करणे हे असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट राहील. यासोबतच डॉक्टरांसाठी शैक्षणिक कार्यशाळा, वैद्यकीय शिबिरे व जनजागृती उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर प्रकाश टाकला व डॉक्टरांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.