Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

आरटीओ बेमुदत संप

प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष; आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर

RTO Indefinite Strike: मोटार वाहन विभाग करमचार्य संघटनाने राजस्थानातील सर्व आरटीओ कार्यालयांमधील करमचारींच्या बेमुदत संपावरावर पुन्हा आंदोलन केले आहे.


प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर

RTO Indefinite Strike |

अमरावती (RTO Indefinite Strike) : मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत  संप पुकारला आहे. संघटनेने यापूर्वी दि. २ जून रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये दोन तासांचे धरणे व निदर्शने आंदोलन करून शासन आणि दि. ९ ला एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलेला होता.
 
या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या (RTO Indefinite Strike) आंदोलनानंतरही मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे पूर्वनियोजित आंदोलनाच्या पुढील टप्प्यानुसार दि. १६ जून रोजी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत  संपात सहभाग नोंदविला.   शासनाने अद्यापही या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने  राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांतील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे.

मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले तसेच अभिजीत गावंडे, अक्षय राठोड, अमोल माठोडे, उज्वल ठाकरे, संजय चौधरी, देवानंद खंडारे आणि अन्य पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर रखडलेल्या असून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन (RTO Indefinite Strike) अधिक तीव्र करण्यात येईल. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.