Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अकोला ते आमला रेल्वे

अकोला ते आमला खु. रेल्वे मार्ग तयार इंजिन ट्रायल यशस्वी

Akola-Amla Railway: अकोला ते खंडवा जुन्या रेल्वे मार्गावर आमला खुर्द पर्यंतचा मार्ग पूर्ण झाला आहे. २३ एप्रिल रोजी यशस्वी इंजिन ट्रायल झाली, आणि लवकरच वाहतुक सुरू होईल.


अकोला ते आमला खु रेल्वे मार्ग तयार इंजिन ट्रायल यशस्वी 

Akola-Amla Railway |

लवकरच वाहतुक होणार सुरू

हिंगोली (Akola-Amla Railway) : अकोला ते खंडवा जुन्या रेल्वे मार्गावर आमला खुर्द पर्यंतचा रेल्वे मार्ग पुर्णपणे तयार झाला असुन २३ एप्रिल रोजी घेण्यात आलेली इंजिन ट्रायल यशस्वी झाली आहे. यामुळे हा जुना व जवळचा रेल्वे मार्ग लवकरच पुर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

जुन्या काळापासून अजमेर हैद्राबाद रेल्वे मार्ग मेळघाटातून सुरू होता. जुने मीटरगेज लोहमार्ग बदलून ब्रॉडगेज करण्यासाठी २०१६ मध्ये हा मार्ग बंद करण्यात आला होता. मध्यंतरी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने हे काम रखडले होते. कालांतराने ही परवानगी मिळाली व काम सुरू झाले. या अंतर्गत अकोला - अकोट हा ५६ किलोमीटर ब्रॉडगेज यापूर्वीच पुर्ण होऊन कार्यरत झाला आहे. यापुढे अकोट ते आमला खुर्द पर्यंत ७० किलोमीटर लोहमार्ग नुकताच पुर्ण झाला आहे. २३ एप्रिल रोजी या मार्गावर इंजिन ट्रायल घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली आहे.

आणखी काही चाचण्या पुर्ण झाल्यानंतर अकोट पर्यंत सुरू असलेली रेल्वे वाहतुक आमला खुर्द पर्यंत होऊ शकेल. दुसर्‍या बाजूने सुरू असलेले काम महू रेल्वेस्थानका पर्यंत पुर्ण झाले आहे. मधे ४८ किलोमीटरचे काम सध्या सुरू आहे.  या मार्गावरील ६५० मीटरचा सर्वात मोठा बोगदा तयार होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अकोला - खंडवा दरम्यान प्रवास कमी होणार आहे. सध्या अकोला येथून खंडवाकडे जाणार्‍या रेल्वे गाड्या भुसावळ - बुर्‍हाणपुर मार्गे जात असल्यााने  अधिकचा वेळ लागत आहे, भविष्यात तो कमी होऊन उत्तर भारत व राजस्थानकडे जाणार्‍या गाड्यांचा प्रवास आणखी कमी होणार आहे.

Related to this topic: